मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! मंडप सजला, सरपंचांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला

आतापर्यंत आपण मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे शपथविधी सोहळे पाहिले असतील, पण सांगलीत पार पडला सरपंचपदाचा भव्य शपथविधी सोहळा      

Updated: Jan 5, 2023, 07:23 PM IST
मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! मंडप सजला, सरपंचांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : तुम्ही आतापर्यंत मुख्यमंत्री (Chief Minister) आणि पंतप्रधानांचे (Prime Minister) शपथविधी सोहळे (Swearing-in Ceremony) पाहिले असतील. मात्र सांगलीच्या (Sangli) वंजारवाडीत असाच शपथविधी सोहळा रंगणार आहे. हा सोहळा आहे सरपंचपदाच्या शपथविधीचा (Oath Ceremony of Sarpanch). होय वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटेंनी सरपंचपदाचा कार्यभार हाती घेण्याआधी शपथविधी सोहळा आयोजीत केला. बीडीओंच्या उपस्थितीत कर्तव्याची शपथ घेऊन त्यांनी कार्यभार स्विकारला. शपथविधीसाठी भव्य मंडप घालण्यात आला होता. प्रवेशद्वारावर केळीचे खांब लावण्यात आले होते. खुर्च्या मागवण्यात आल्यात होत्या. 

गावकऱ्यांचीही अगदी लगीनघाई सुरु असल्याचं चित्र वंजारवाडीत दिसतं होतं. सरंपच झाल्यापासून जणून गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखंच वाटतंय असं अरुण खरमाटेंनी म्हटलंय. म्हणूनच मुख्यमंत्र्यांसारखा शपथविधी सोहळा त्यांनी आयोजीत केला होता. 

सरपंच पदाचे वाढलेले अधिकार पाहून यंदाच्या निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक चुरशीची झाली. यात जे आता गावचे सरपंच झालत्याना आपण गावचा जणू मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतेय. असेच सांगली जिल्ह्यातील वंजारवाडी गावच्या सरपंच पदावर विराजमान झालेल्या अरुण खरमाटे यांच्या बाबतीत झालंय. त्यामुळे त्यांनी गावात चक्क सरपंच पदाचा पदभार आणि शपथविधीसाठी भव्य सोहळा आयोजित केला होता. 

यासाठी त्यांनी जसे मुख्यमंत्री पदाचे शपथविधी सोहळे पार पडतात तसंच सरपंच पदाच्या पदभार आणि शपथविधी सोहळ्याचे नियोजन करण्यात आलं होतं. बीडीओच्या उपस्थितीत अरुण खरमाटे यांनी शपथ घेतली. कर्तव्याची शपथ घेऊनच खरमाटे यांनी कार्यभार स्वीकारला. आज दुपारी हा शपथविधी सोहळा पार पडला.