गुरुपौर्णिमा : शिर्डीमध्ये साईंच्या चरणी भक्तगणांचं लोटांगण

देशभरातील भाविकांची गर्दी 

Updated: Jul 27, 2018, 09:34 AM IST
गुरुपौर्णिमा : शिर्डीमध्ये साईंच्या चरणी भक्तगणांचं लोटांगण  title=

शिर्डी : शिर्डीतील गुरुपोर्णिमाच्या उत्सावाची आज पहाटे काकड आरतीने  सुरवात झाली आहे. आज गुरुवार आणि गुरुपोर्णिमा उत्सवाचा पहिला दिवस असा योग जुळून आला आहे. साईबाबांना गुरु स्थानी मानणारे हजारो भक्तगण दर गुरुवारी शिर्डीची वारी करतात. त्यात आज गुरुपोर्णिमा उत्सवास सुरुवात झाल्याने साईच्या दर्शनासाठी देशभरातील भाविकांनी गर्दी केलीय. 

शिर्डीत दर गुरुवारी मध्यरात्री साईंची द्वारकामाईतून पालखी निघते. आजही उत्सव आणि गुरुवार असल्याने साई मंदिरातून साईबाबांच्या पादुका आणि फोटोची सवाद्य मिरवणूक काढून द्वारकामाईपर्यंत आणण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली. 

पादुका फोटो साईंच्या पालखी ठेवण्यात आला. त्यानंतर नगरप्रदक्षिणा करून आल्यावर शेजआरती करण्यात आली.