गणपती बाप्पासाठी हापूस आंब्यांचा नैवेद्य

कोकणात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Updated: Sep 15, 2021, 10:57 PM IST
गणपती बाप्पासाठी हापूस आंब्यांचा नैवेद्य title=

सिंधुदुर्ग : कोकणात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाच सावट असूनदेखील कोकणात मात्र याही वर्षी घरात का होईना मात्र त्याच उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कोकणाची ओळख असलेलं फळ आणि फळांचा राजा आंब्याचा नैवेद्या गणपती बाप्पाला दाखवण्यात आला. वेंगुर्ल्यातील प्रितम जगन्नाथ सावंत याच्या घरी हा नैवेद्य दाखवण्यात आला. प्रितम यांचा वेंगुर्लामध्ये आंब्याचा व्यवसाय आहे. आणि त्यांच्याच बागेतील ही पेटी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून दाखवण्यात आली आहे.

आंब्याचा नैवेद्य
गणपती बाप्पा म्हटलं की, त्याला दाखवला जातो मोदकाचा नैवेद्य, पण कोकणात एक वेगळा प्रकार पहायला मिळाला तो म्हणजे चक्क आंब्याचा नैवेद्य आता तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर आंब्याची पेटी कशी आली. तर होय हा आंबा कोकणातला हापूसच आहे. पण हा आंबा नैसर्गिकरित्या पिकवला नसून, हा आंबा गेले चार महिने फ्रिजमध्ये ठेवून साठवणूक करण्यात आली.  प्रितम यांच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्सवात पार पडतो.

जादा एसटी गाड्या
गणपतीला गावी जात नाही, असा कोकणी चाकरमानी सापडणं मुश्कील... कुणी एसटीनं, तर कुणी लक्झरी गाडीनं... कुणी खासगी कारमधून, तर कुणी कोकण रेल्वेनं... दरवर्षी गणपतीला न चुकता गावी जाणार म्हणजे जाणारच... कोकणी चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नन पार पडावा, यासाठी एसटी महामंडळानं शेकडो बसगाड्या कोकणात सोडल्यात...

मुंबई गोवा महामार्गावर सर्वत्र वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेत. गणेशभक्तांना टोलमाफी केल्यानं तळकोकणात जाण्यासाठी गणेशभक्त मुंबई बंगळुरू एक्स्प्रेस वेचा वापर करतायत... कोकण रेल्वेनं देखील जादा रेल्वेगाड्यांची सोय केल्यानं आणि त्या गाड्या वेळेवर सोडल्यानं रस्ते वाहतुकीवरचा ताण थोडा हलका झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे ११ दिवस कोकणात उत्सवाचं वातावरण पहायला मिळतं.