धक्कादायक! पत्नीची ''हायटेक हेरगिरी'', प्रत्येक कॉल नवऱ्याला ऐकू यायचा... पण असं झालं..

हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर पत्नीने स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

Updated: Sep 15, 2021, 08:32 PM IST
धक्कादायक! पत्नीची ''हायटेक हेरगिरी'', प्रत्येक कॉल नवऱ्याला ऐकू यायचा... पण असं झालं..  title=

पुणे : नवरा-बायकोत वाद (Husband Wife Clashes) होत नाहीत, असं जोडपं शोधून सापडणार नाही. या वादामागील कारण हे वेगवेगळं असतं. आर्थिक कारण, स्वभाव, तसंच संशयी वृत्तीमुळे पती-पत्नीत वाद होतात. पतीकडून पत्नीच्या चरित्र्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आपला पार्टनर किंवा प्रियकर आपल्या पाठीमागे काय करतो, हे जाणून घेण्यासाठी प्रायव्हेट एंजेटही लावतात. अशाच एका पुण्यातील पतीला त्याच्या पत्नीवर संशय होता. बायको नेमकं काय करतेय हे जाणून घेण्यासाठी पतीने पत्नीच्या नकळत मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर इनस्टॉल केला होता.

याबाबत पत्नीला तब्बल 8 वर्षानंतर समजलं. हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर पत्नीने स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार हा पुण्यातील (Pune) आहे. (pune police arrested Husband downloads recording app in wife's mobile  over to suspicion of character)

पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीविरुद्ध आयटी कायदा आणि विनयभंगासह 37 वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 23 डिसेंबर 2013 ते 5 मे 2017 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. 

नक्की कारण काय?

"पती नेहमी पैशांची मागणी करायचा. यावरुन आमच्यात कडाक्याच भांडण व्हायचं. पती माझ्यावर चरित्रावरुन संशय घ्यायचा. संशयावरुन  मारहाण करायचा तसेच अपशब्द वापरायचा. मी काय करतेय, हे जाणून घेण्यासाठी नामी शक्कल लढवली. मला मोबाईल गिफ्ट दिला. या मोबाईलमध्ये  आधीच स्पाय अ‍ॅप अॅन्ड रेकॉर्डर अ‍ॅप डाऊनलोड केला होता.

या अ‍ॅपद्वारे मी काय करेतय, याबाबतची माहिती पतीला मिळायची. पती हा सर्व डेटा लॅपटॉपमध्ये घ्यायचा. या माहितीचा तो गैरवापर करायचा", अशी माहिती पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या तक्रारीनुसार दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणी पोलिीस अधिक तपास करत आहेत.