राज्यभरात मुसळधार पाऊस, धरणं भरली

पावसानं राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळे राज्यातील महत्त्वाची धरणं भरुन वाहू लागलीत.

Updated: Sep 20, 2017, 05:41 PM IST
राज्यभरात मुसळधार पाऊस, धरणं भरली title=

मुंबई : पावसानं राज्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळे राज्यातील महत्त्वाची धरणं भरुन वाहू लागलीत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणा-या पावसामुळे धरणाचे सहाही वक्री दरवाजे एक फूटाने उघडण्यात आलेत. कोयना धरणातून 9 हजार 287 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

कोल्हापुरातही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरण शंभर टक्के भरलंय. वारणा धरणही शंभर टक्के भरलंय. तिकडे सांगलीतही चांदोली धरण फुल्ल झालंय.

पुण्यातही धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून 23 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पालघरमध्ये सूर्या नदीवरील धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेत. या धरणातून 5 हजार 600 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर पालघरमधील कावादास धरणातून 18 हजार 800 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x