भरकटलेली गुजरातची मासेमारी नौका रत्नागिरीत

गेले तीन रत्नागिरी जिल्ह्यात दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात वारे आणि पावसाचा जोर आहे. खवळलेला समुद्रामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्रावर वाळूत रुतली. ही नौका  तटरक्षक दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2017, 04:42 PM IST
भरकटलेली गुजरातची मासेमारी नौका रत्नागिरीत title=

मुंबई : गेले तीन रत्नागिरी जिल्ह्यात दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात वारे आणि पावसाचा जोर आहे. खवळलेला समुद्रामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्रावर वाळूत रुतली. ही नौका  तटरक्षक दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवली. 

गुजरातची ही नौका मंगळवारी रात्री भरकटली. या नौकेवर एकूण दहा खलाशी होते. भरकटल्यामुळे ही नौका मिरकरवाडा बंदरात जाण्याऐवजी मिऱ्या येथे पांढऱ्या समुद्रावर वाळूत येऊन अडकली. नौकेवरील सर्व खलाशी सुखरुप आहेत. 

रात्री उधाणाच्या भरतीत ही बोट कलंडून फुटण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र सुदैवाने तसे काहीही झालेले नाही. या नौकेत तीन मासे होते. यामुळे ती सातत्याने एका बाजूला झुकत होती. किनाऱ्यावर आल्यानंतर ही नौका क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x