पर्यटन वाढीसाठी मालवणात हेलिकॉप्टर राईड उपक्रम

मालवणची सफर करु इच्छिणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. मालवण म्हटलं कि मालवणचे  निळेशार समुद्र किनारे आणि समुद्राखालचं जग न्याहाळण्याची संधी असं दृष्य उभं राहतं. 

Updated: May 20, 2018, 10:56 AM IST
पर्यटन वाढीसाठी मालवणात हेलिकॉप्टर राईड उपक्रम title=

मुंबई : मालवणची सफर करु इच्छिणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. मालवण म्हटलं कि मालवणचे  निळेशार समुद्र किनारे आणि समुद्राखालचं जग न्याहाळण्याची संधी असं दृष्य उभं राहतं. आता यासगळ्यात आणखी भर पडलीय ती हवाई सफरीची.. कारण आता तुम्ही आकाशातूनही कोकण पाहू शकणार आहात...  मालवण मधील युवा पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू आणि अन्वय प्रभू यांच्या पुढाकारातून मालवण मध्ये प्रथमच हेलिकॉप्टर पर्यटनाची संकल्पना  राबवण्यात येत आहे. तर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा  याला चांगला प्रतिसाद मिळातोय. 

जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. दुर्गदर्शन मोहिमेंतर्गत हेलिकॉप्टर मधून किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाची सोय मालवणांत उपलब्ध करण्यात आली आहे.  पुण्यातील राष्ट्रशक्ती संघटनेनं हवाई दुर्गदर्शन अंतर्गत मालवणात हेलिकॉप्टर मधून सिंधुदुर्ग किल्ला न्याहाळण्याची हि संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली आहे.