नागपुरात जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने केलं मतदान

लोकसभा निवडणूक 2019 (lok sabha elections 2019) च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.

Updated: Apr 11, 2019, 05:07 PM IST
नागपुरात जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने केलं मतदान title=

नागपूर : लोकसभा निवडणूक 2019 (lok sabha elections 2019) च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.  20 राज्यांमध्ये मतदान सुरु आहे. एकूण 91 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. 91 ठिकाणी 1279 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसत आहे. सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या आहेत. मतदान केंद्रावर सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

महाराष्‍ट्राच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने आज मतदान केलं. ज्योती आम्गे असं या महिलेचं नाव आहे. त्यांची उंची २ फूट १ इंच आहे.

नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्य़ा रिंगणात आहेत. नागपूरमध्ये 1 वाजेपर्यंत 27.46 टक्के मतदान झालं आहे.