पिंपरी-चिंचवडमध्ये माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला

घरगुती वादातून पतीने पत्नीला चाकूने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. आरोपी फिरोज शेख आणि त्याची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. 

Updated: Aug 7, 2017, 08:51 AM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये माथेफिरु पतीचा पत्नीवर हल्ला title=

पिंपरी-चिंचवड : घरगुती वादातून पतीने पत्नीला चाकूने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. आरोपी फिरोज शेख आणि त्याची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. 

याच कारणातून त्यांने पत्नीवर चाकुने वार केले. यामध्ये त्याच्या पत्नीच्या गालाला लागलंय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. 

जागरुक नागरिक आणि पोलीस कर्मचा-यांमुळे या महिलेचे प्राण वाचले नाहीतर माथेफिरू पतीने आपल्या पत्नीला यमसदनी नक्की पाठवलं असतं. 

ही घटना मोशी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.