Mumbai Pune Expressway Travel : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेने आज प्रवासाला निघण्याआधी ही बातमी जरुर वाचा. (Mumbai - Pune Expressway) पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कळंबोली गावाजवळ आज वाहतूक बंद असणार आहे. कळंबोली गावाजवळच्या पट्ट्यात दुपारी बारा ते तीन या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद असेल. (Traffic Block On Mumbai Pune Expressway Near Kalamboli Village)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळंबोली गावाजवळ उच्च दाब वाहिनीसाठी कमान टाकण्याचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी या मार्गावरची वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश ईन हॉटेलजवळून पनवेल रॅम्पपासून मग पुन्हा एक्स्प्रेस वे मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे. काम सुरु असण्याच्या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन रस्ते महामंडळाने केले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर (पुण्याच्या दिशेने) कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड गॅन्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कळंबोली गावाजवळील भागातील वाहतूक वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, काही अडचण असेल तर मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांनी मोबाइल क्रमांक 9822498224 वरून नियंत्रण कक्षाशी किंवा मोबाइल क्रमांक 9833498334 वरुन महामार्ग पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मार्गावरील वाहतूक कळंबोली गाव - पनवेल सर्कल - देवांश ईन हॉटेल मार्गे पनवेल रॅम्पकडून द्रुतगती मार्गाने पुण्याकडे वळविण्यात आली आहे. तसेच या कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.