नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...

पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने आपल्या चार महिन्याच्या बाळाची हत्या करुन आत्महत्या केली आहे. 

Updated: Jul 8, 2024, 11:53 PM IST
नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग...  title=

Palghar Crime News :  पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन वाद विवाद होतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला पोहचतात की होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे.  नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायको  धक्कादायक कृत्य केले. यामुळे चार महिन्याच्या बाळाचा नाहक बळी गेला आहे. 

पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मना धरून एका मातेने आपल्याच साडे चार महिन्याच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या करत नंतर गळफास घेत स्वतःही आत्महत्या केल्याची हृदय हादरवणारी घटना पालघर मध्ये समोर आली आहे. पालघरच्या डहाणूतील सिसने येथे ही घटना घडली आहे. 

मनीषा राजड (वय वर्ष 23) असे मृत महिलेचे नाव आहे.  या मातेने आधी आपल्या साडेचार महिन्याच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली . त्यानंतर तिने स्वतः आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे.

पतीसोबत वाद

मनीषाचे पती हे मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असून ते नेहमीच घराबाहेर असत . पाऊस सुरू झाल्यानंतर ते घरी परतले. मात्र, परवा पुन्हा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेल्याचा राग मनात धरून मनीषाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे . या प्रकरणात मयत मनीषा विरोधात आपल्याच चिमुकल्या मुलीची हत्या केल्या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

प्रेयसीकडून प्रियकराला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न 

मित्राच्या मदतीने प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना रविवारी पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात घडली आहे. घटने प्रकरणी प्रेयसीचा मित्र प्रेमदास विठ्ठल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेयसीला देखील अटक केली आहे. प्रियकर अब्दुल कलाम हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसी आणि प्रियकर यांच्यात झालेल्या वादातून प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकर अब्दुल कलाम ची दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना चिखली कुदळवाडी परिसरात घडली आहे. प्रेयसी चा विवाह झाला असून गंभीर जखमी असलेल्या प्रियकर हा तिला पती आणि मुलांना सोडून माझ्याकडे राहण्यास ये अस म्हणायचा. यातून त्यांचं अनेकदा भांडण देखील झालं. याच गोष्टीला कंटाळून मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटने प्रकरणी प्रेयसी आणि तिच्या मित्राला चिखली पोलिसांनी अटक केली आहे