दीड महिन्यानंतर चिमुरड्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला; आईचे कृत्य पाहून पुणे पोलिस चक्रावले

जन्मदात्या आईनेच आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या करुन मृतदेह दरीत फेकला. दीड महिन्यानंतर याचा उलगडा झाला. 

Updated: Aug 28, 2023, 09:42 PM IST
 दीड महिन्यानंतर चिमुरड्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला; आईचे कृत्य पाहून पुणे पोलिस चक्रावले title=

Pune crime news :  पुणे पोलिसांनी तब्बल दीड महिन्यानंतर चिमुरड्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. तपादरम्यान या चिमुरड्याच्या हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे.  आईचे कृत्य पाहून पुणे पोलिस चक्रावले आहेत. आईनेच प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या केली असल्याचे तपासात उघडकीस आले. 

प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला. चिमुरड्याचा गळा दाबून खून करून मुलाचे मृतदेह पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिला होता. आई रेणू पवार आणि प्रियकर उमेश अरुण साळुंके यांना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. दीड महिन्यापूर्वी चिमुकल्याची हत्या करण्यात आली होती. मोठ्या शिताफीने जेजुरी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. दोघेही आरोपी सोलापूर जिल्ह्यातील मोडलींब माढा येथील आहे. 
आरोपी सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब येथे राहणारे आहेत. 

आई आणि तिच्या प्रियकराने त्यांच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चिमुरड्याचा गळा दाबून हत्या केली. चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर केल्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरसजवळील घाटात फेकून दिले होता. ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती. 

मृत मुलाची मावशी म्हणजेच आरोपी महिलेच्या चुलत बहिणीने या प्रकरणाची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली होती. मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी वर घेवून येवून ते पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिला होता.

याबाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्याच्या प्रेताचे अवशेष शोधून काढले आहेत. या दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत.