नागपूर-पुणेकरांसाठी समर स्पेशल सुपरफास्ट ट्रेन! जाणून घ्या वेळापत्रक

Nagpur-Pune-Nagpur Superfast Summer Special Trains: सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेकडून जादा ट्रेन सोडण्यात येतात. दरम्यान नागपूर, पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Updated: Apr 12, 2024, 03:33 PM IST
नागपूर-पुणेकरांसाठी समर स्पेशल सुपरफास्ट ट्रेन! जाणून घ्या वेळापत्रक title=
Nagpur Pune Superfast Summer

Nagpur-Pune-Nagpur Superfast Summer Special Trains: भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. दररोज लाखो प्रवासी यातून प्रसार करत असतात. माफक दरात दुरवरच्या प्रवासासाठी प्रवासी भारतीय रेल्वेची निवड करतात. सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेकडून जादा ट्रेन सोडण्यात येतात. दरम्यान नागपूर, पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

मध्य रेल्वेकडून नागपूर-पुण्यादरम्यान रेल्वेच्या फेरी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर या जादा फेऱ्या दिसतील. आठवड्याच्या 2 ते 3 दिवसांसाठी नागपूर-पुणे-नागपूर दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये या प्रवासी मार्गाला खूप मागणी आहे. येथील वाढती प्रवासी संख्या पाहता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतलाय. 

ट्रेनच्या एकूण 13 फेऱ्या 

18 एप्रिलपासून नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट समर स्पेशल ट्रेन सुरु होणार आहे. 01165 हा ट्रेन नंबर असेल. ही ट्रेन आठवड्यातील 3 दिवस धावेल. 13 जूनपर्यंत दर गुरुवारी ही ट्रेन नागपूरहून सुटेल. म्हणजेच या ट्रेनच्या एकूण 13 फेऱ्या होतील. 

पेट्रोल गाडी विसरा, 'अशी' वाढेल इलेक्ट्रीक कारची बॅटरी लाइफ

ट्रेनची रचना

18 एलएचबी कोच, 2 एसी-२ टायर, 10 एसी थ्री टायर इकोनॉमी, लगेज कम कार्ड ब्रॅक व्हॅनसह 5 जनरल सेकंड क्लास आणि 1 जनरेटर कार अशी ट्रेनची रचना आहे. 

रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘याला’ पाहताक्षणी पळतात फुकटे! कोण आहे हा 'करोडपती' TC?

बुकींग सुरु

समर स्पेशल ट्रेनसाठी 13 एप्रिलपासून बुकींग सुरु होणार आहे. आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर तुम्हाला याचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे.

रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही