पुणे : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत नसताना सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वाचा भाग असलेल्या कोरोना कीट चाचणीवर पुण्यात यशस्वी संशोधन झालंय. हा भारतातील पहीला स्वदेशी कोरोना कीट ठरला आहे. या कीटमुळे कमी वेळात कोरोना चाचणी होणं शक्य होणारं आहे. हा कीट चाचणीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे, कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने हा लॉकडाऊन कालावधी देखील वाढण्याची शक्यता आहे. या सर्वात कोरोना चाचणी ही महत्वाची आहे. कारण यामुळेच नेमके रुग्ण लक्षात येतात. त्यांच्यावर आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांवर उपचार करणं किंवा विलगीकरणं करणं सोपं जातं. याच प्रयोगाला पुण्यात यश आलं आहे.
कोरोनाच्या चाचणीसाठी RTPCR करणं गरजेचं असतं. दरम्यान NIV पुण्याने कोरोनासाठी एंटीबॉडी IgG Elisa टेस्ट कीट तयार केलं आहे. कोविड कवच एलिसा टेस्ट असे नाव याला देण्यात आलंय.
मोठी लोकसंख्या असलेल्या वस्तीत हा कीट महत्वाची कामगिरी बजावणार आहे. दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना रुग्ण शोधून काढणं यामुळे सोपं होईल. मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी या कीटची चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरली.
अवघ्या अडीच तासांमध्ये ९० सॅम्पल टेस्ट करणं यामुळे शक्य होणार आहे. DCGI ने याच्या कमर्शिअल प्रोडक्शनसाठी zydus cadila कंपनीला परवानगी दिली आहे.
एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या व्हायरसची लागण झाली असेल तर त्याच्या शरीरातील त्या विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी एंटीबॉडीज तयार होतात. शरीरात एंटीबॉडीज शोधण्यासाठी रॅपिट टेस्टची आवश्यक असते. एंटीबॉडीज टेस्टसाठी कमी वेळ लागतो. तर कोरोना चौकशीसाठी आरटीपीसीआर रिपोर्टसाठी कमीत कमी २४ तास लागतात.
एंटीबॉडीज टेस्टसाठी १ किंवा २ थेंब रक्त घेतलं जातं. व्हायरसला शरीरातून निकामी करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीने एंटीबॉडीज बनवावे की नाही ? हे यातून समोर येते.