Nayanthara Gets Angry on Dhanush : दाक्षिणात्य ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून अभिनेत्री नयनतारा ही ओळखली जाते. आता नयनताराच्या आयुष्यावर आधारीत एक डॉक्युमेंट्री येणार आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनताराच्या आयुष्यातील तो भाग तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार जो तिच्या चाहत्यांना कधी पाहायला मिळाला नाही. एकीकडे चाहत्यांमध्ये आणि नयनताराला या डॉक्युमेंट्रीविषयी खूप उत्सुकता आहे तर दुसरीकडे तिनं शेअर केलेल्या एका पोस्टकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. नयनतारानं सोशल मीडियावर अभिनेता धनुषविषयी अशी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे सगळीकडे त्या दोघांचीच चर्चा सुरु आहे.
'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' ही सीरिज 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. नयनतारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत धनुषला एक ओपन लेटर लिहिलं आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनतारानं धनुषच्या 'नानुम राउडी धान' या चित्रपटातील गाणं आणि काही व्हिज्युअल वापरले आहेत, आधी तिनं यासाठी परवानगी मागितली होती, पण धनुषनं त्यासाठी नकार दिला. त्यामुळे संतप्त नयनतारानं ही पोस्ट शेअर केली आहे.
नयनतारानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की तुमच्यासारखा मोठा अभिनेता, जो त्याच्या वडिलांच्या आणि भावाच्या मदतीनं तयार झाला, तुम्हाला हे वाचण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे की चित्रपटात माझ्यासारख्या कलाकारांसाठी टिकून राहणं इतकं सोपं नाही, आज मी जे काही आहे ते माझ्या मेहनतीवर आहे. चित्रपटसृष्टीत कोणा दुसऱ्याच्या हिंम्मतीवर आले नाही. माझ्या कामासाठी मला प्रेक्षक ओळखतात आणि माझ्याविषयी काही चुकीचं नाही, त्यामुळे माझे चाहते माझ्या डॉक्यूमेन्ट्रीची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. तर ही डॉक्युमेन्ट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नयनतारानं पुढे सांगितंल की 'तुम्ही जे काही वागला आहात, त्यामुळे फक्त माझा चित्रपट नाही, तर माझ्यावर आणि माझ्या जोडीदारावर परिणाम होईल. त्याशिवाय तुमच्या चित्रपटावर देखील लवकरच त्याचा परिणाम दिसणार आहेत. हा चित्रपट माझं आयुष्य, प्रेम, लग्न, माझा जोडीदार आणि इंडस्ट्रीते काही असे लोक ज्यांनी माझी साथ दिली त्यांच्याविषयी सांगेन. पण याविषयी हे वाईट वाटतं की त्यात स्पेशल आणि महत्त्वाचं असलेल्या नानुम राउडी धानचा काही उल्लेख होणार नाही.'
हेही वाचा : कपूर कुटुंबातच्या सुनेच्या One Night Standची गोष्ट... पुढं जे घडलं ते सारंकाही अनपेक्षितच!
पुढे नयनतारा म्हणाली, 'दोन वर्ष तुमच्याशी एनओसीसाठी भांडले आणि त्यासोबतच माझ्या डॉक्युमेन्ट्रीसाठी परवानगी मागितली. पण तुम्ही परवानगी दिली नाही आणि आता आम्हाला ते सोडावं लागलं आणि आता आम्ही पुन्हा एकदा ते एडिट करणार आहोत. गाण, नानुम राउडी धान, एक हिट सॉन्ग आहे. त्यात सगळ्या भावना आहेत, डॉक्युमेंट्रीमध्ये याचा वापर केल्यानं आम्हाला दुसरं काही मिळालं नाही, माझं मन दुखावलं.'
नयनतारा म्हणाली, 'ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुमच्याकडून आलेल्या लीगल नोटिसनं मला खूप मोठा धक्का बसला. लीगल नोटिसमध्ये आम्ही ते वाक्य वाचून हैराण झालो, ज्यात तुम्ही फक्त 3 सेकंदाच्या व्हिज्युएल्सवर प्रश्न उपस्थित केला होता. महत्त्वाचं म्हणजे हे व्हिज्युएल्स आम्ही आमच्या स्वत: च्या पर्सनल डिव्हाइस आणि काही बीटीएस व्हिज्युअल्समधून घेण्यात आले होते आणि त्यासाठी तुम्ही 10 कोटींची नोटिस बजावली. जसे तुम्ही स्टेवर दिसता, तसे तुम्ही नाहीत आणि लोकांमध्ये लोकप्रिय आहात. कोणता निर्माता लोकांच्या आयुष्यासोबत, त्यांच्या स्वातंत्र्याशी खेळतो का? आम्हाला लीगल नोटिस मिळाली आहे आणि त्याचं उत्तर हे कायदेशीरपणे देण्यात येईल, आता या सगळ्यावर कोर्टात निर्णय घेण्यात येईल.'