इंदुरीकरांनी रावणाचा अहंकार मांडतांना, कैद्यांना खळखळून हसवलं..!

आपल्या कीर्तनातून, हास्याचे फवारे उडवत, हळूच वास्तवाची जाणीव करून देत, सत्याचे चटके ठेवणारे, हभप कीर्तनकार आणि ज्यांना आता प्रबोधनकार असं म्हटलं जातं.

Updated: Jul 18, 2018, 02:30 PM IST

पुणे : आपल्या कीर्तनातून, हास्याचे फवारे उडवत, हळूच वास्तवाची जाणीव करून देत, सत्याचे चटके ठेवणारे, हभप कीर्तनकार आणि ज्यांना आता प्रबोधनकार असं म्हटलं जातं, असे इंदुरीकर महाराज यांनी पुण्यातील येरवडा जेलला भेट दिली. इंदुरीकर यांनी जेलला नुसती भेटंच नाही दिली, तर कैद्यांसाठी कीर्तन देखील केलं. ( कीर्तनाचा संपूर्ण व्हिडीओ पाहा बातमीत खाली)

इंदुरीकरांनी मांडला रावणाचा अहंकार साध्या शब्दात

इंदुरीकरांनी पुण्यातील येरवडा जेलमध्ये रावणाचा अहंकार कसा होता, आणि त्याच्या अहंकाराविरोधात नंतरची परिस्थिती कशी झाली. रावणाला देखील अहंकार सोडावा लागला, असं इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनातून पुण्यातील येरवडा जेलमध्ये उदाहरण देऊन मांडलं. 

येरवडा जेलचे कैदीही खळाळून हसले

पण इंदुरीकर यांनी हे संदर्भ त्यांच्या अनोख्या शैलीत मांडली आणि सतत तणावात असलेल्या कैद्यांचं भरपूर मनोरंजन तर झालंच, पण त्या सोबत मनापासून प्रबोधन झालं. नेहमी चिंतेत असलेले कैदी तेथे खळाळून हसत होते.