धक्कादायक ! बस्ता बांधण्यासाठी गेलेल्या नववधुला पाणी ऐवजी दिलं फरशी पुसण्याचं लायझोल

लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी कपड्याच्या दुकानात गेलेल्या तरूणाला पाणी म्हणून फरशी पुसण्याचं लायझोल दिल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात घडला आहे. सुदैवानं नववधूवरील संकट थोडक्यात निभावलं. 

Updated: May 10, 2022, 10:41 PM IST
धक्कादायक ! बस्ता बांधण्यासाठी गेलेल्या नववधुला पाणी ऐवजी दिलं फरशी पुसण्याचं लायझोल  title=

पंढरपूर : लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी कपड्याच्या दुकानात गेलेल्या तरूणाला पाणी म्हणून फरशी पुसण्याचं लायझोल दिल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात घडला आहे. सुदैवानं नववधूवरील संकट थोडक्यात निभावलं. 

पंढरपूर शहरातील आविष्कार या कपड्याच्या दुकानात गोपाळपूरमधील एक कुटुंब नववधूसह लग्नाच्या बस्त्याची खरेदी करण्यासाठी गेले होते. नववधूला तहान लागली म्हणून तिने दुकानातील कामगारांकडे पाणी मागितलं. तिथं पाण्याच्या बाटलीत फरशी पुसण्यासाठी लागणारं लायझोल केमिकल होतं. नजरचुकीनं तीच बाटली तरूणीला पाणी म्हणून दिली गेली. 

त्या बाटलीतील पाणी पिताच तरूणीच्या घशात जळजळ होऊ लागली. त्यानंतर तिला तात्काळ पंढरपूरच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.