Jabalpur Double Murder Case : गुन्हेगारी विश्वातील वाढती तल्खता पोलिसांसमोर नवं आव्हान उभं करत आहे. काही क्राईम स्टोरी अंगावर काटा आणणाऱ्या असतात. अशातच जबलपूरमधील डबल मर्डर केसमुळे पोलिसांची दैना उडाल्याचं पहायला मिळतंय. आपल्या जन्मदात्या पित्याला अन् लाडक्या भावाला संपवून एका 16 वर्षाच्या मुलीने बॉयफ्रेंडसोबत पळ काढला होता. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर असले तरी शातिर बॉयफ्रेंडने पोलिसांना नेहमी चकवा दिलाय. अशातच आता जबलपूर डबल मर्डर केसचे धागेदोरे आता पुण्यात सापडल असून पोलिसांनी आपल्या हालचाली वाढल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं अखेरचं लोकेशन पुण्यात सापडलं. आरोपी तरुणी बॉयफ्रेंडसोबत पुण्यातून एका रेस्टॉरेंटमध्ये दिसून आली. अशातच आता पोलिसांनी आरोपींना पडकण्यासाठी टीम विविध ठिकाणी रवाना केली आहे.
बाप किचनमध्ये अन् भाऊ फ्रिजमध्ये...
रेल्वेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले 52 वर्षांचे राजकुमार विश्वकर्मा आपल्या दोन मुलांसोबत राहत होते. 16 वर्षांची मुलगी अन् 8 वर्षाच्या मुलासोबत राजकुमार कुटूंब सांभाळत होते. मागील वर्षी पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानंतर मुलांना धक्का बसला होता. त्यामुळे राजकुमार मुलांकडे लक्ष देऊ लागले. जवळच राहणारा मुकुल सिंह हा आरोपी तरुणीला आवडत होता. त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले अन् तरुणी बाप-लेकाची हत्या करून बॉयफ्रेंडसोबत पसार झाली. मात्र, तरुणीने हत्या का केली? असा सवाल विचारला जातोय.
नेमकं काय घडलं?
राजकुमार विश्वकर्मा घरातील काम देखील करत होते. दररोज स्वयंपाक आणि नाष्टा करून कामावर जायचं हा त्यांचा नित्यक्रम होता. दोन दिवसापूर्वी सकाळी तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडने प्लॅन आखला. मुकुल तरुणीच्या घराबाहेर सकाळी 6 वाजल्यापासून पहारा देत उभा होता, अशी माहिती पोलिसांना मिळालीये. प्लॅन ठरल्याप्रमाणे आमलात आणण्यासाठी मुकूल अन् त्यांच्या आरोपी तरुणीने सकाळी सात वाजता दरवाजे उघडले अन् इथून सुरू झालं रक्तरंजीत हत्याकांड...
सकाळी सात वाजता वडील राजकुमार मुलांना नाष्टा तयार करत होते. मुलांना डब्बा देखील तयार करण्यास सुरूवात केली. तेव्हा बॉयफ्रेंडने घरात शिरकाव केला अन् वजनदार वस्तूने तरुणीच्या वडिलांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर पॉलिथिनमध्ये गुंडाळून राजकुमार यांना किचनमध्येच ठेवण्यात आलं. तर शेजारी राहणाऱ्या आणि वॉचमेनने सांगितलंय की, आठ वाजल्याच्या सुमारास मुलीचा ओरडण्याचा आवाज आला होता. दोघंही आवाजाच्या दिशेने धावले. मात्र, घरातून कोणताही रिस्पॉन्स न आल्याने त्यांनी आपली वाट धरली. भावाला मारताना पाहून आरोपी मुलगी ओरडली असेल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
शुक्रवारी सकाळी 9 वाजता दूधवाला आला, तेव्हा नेहमीप्रमाणे मुलीने दुध घेतलं अन् दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर त्यांनी वडिलांचा मृतदेह स्वयंपाकघरात तर भावाचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी लगेच पळून जाण्याचा निर्णय घेतला नाही. हत्या केल्यानंतर दोघंही चार तास मृतदेहासमोर बसून होते. त्यांनी त्याचठिकाणी बसून नाष्टा देखील केला. 11 च्या सुमारास बॉयफ्रेंड मुकुल आपल्या गाडी घेऊन बाहेर पडला. तेव्हा त्याच्याकडे काळी बॅग होती. तर तरुणी 10 मिनिटानंतर घराबाहेर आली. तरुणीच्या हातात फक्त मोबाईल फोन होता. त्यानंतर त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठलं अन् पळ काढला.
पोलिसांना चकवा देण्यासाठी रिलस्टार मुकूलने आपल्या फोनचा नायनाट केला, पण मुलीच्या एटीएम कार्डवरून पोलिसांनी धागेदोरे शोधले. एसपी आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितले की, राजकुमारचा भाऊ बाबू विश्वकर्मा यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोघंही उत्तर प्रदेशात गेल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी आग्रा, अयोध्या, मथुरा आणि बनारस पोलिसांशीही संपर्क साधला होता. मात्र, आता तरुणीचं लोकेशन पुण्यात लोकेट झाल्याने पोलिसांनी अॅक्टिवमोडमध्ये आले आहेत.
आरोपी मुकुल सिंगला जीममध्ये जाण्यात जास्त रस होता. अभ्यास हुशार नसला तरी, त्याने वयाच्या 17 व्या वर्षी त्याने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली होती. परिसरात हवा करण्यासाठी मुकुल सोशल मीडियावर अॅक्टिव होता. त्याला मॉडेलिंगचीही आवड होती, अशी माहिती देखील पोलिसांकडून समोर आली आहे.