व्यापाऱ्यांनी संधीचा गैरफायदा घेऊ नये, जयंत पाटलांचे आवाहन

व्यापाऱ्यांनी संधीचा गैरफायदा घेऊ नये असे आवाहन 

Updated: Mar 28, 2020, 11:52 AM IST
व्यापाऱ्यांनी संधीचा गैरफायदा घेऊ नये, जयंत पाटलांचे आवाहन

मुंबई : व्यापाऱ्यांनी संधीचा गैरफायदा घेऊ नये असे आवाहन राज्यमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवू नका,व्यापाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करा असे देखील ते म्हणाले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. 

आम्हाला भारतात यायचंय असे परदेशातून फोन येतायत पण आता सीमा बंद झाल्या आहेत. अनेक राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिथे आहात तिथे सुरक्षित राहा असे पाटील म्हणाले.

सरकारच्या सीमांचं पालन जनतेनं कराव. कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर घरी राहणं हाच उपाय असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

नाशिक भागात द्राक्ष बागायतदारांची तसेच काही ठिकाणी केळी बागायतदारांची समस्या समोर आली यावर मार्ग काढला जात आहे. 

इस्लामपुरात एकूण २३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेले आहेत. रुग्ण आढळलेला हा विभाग सील करण्यात आला आहे. 

कोरोनाबाबत सांगलीता प्रश्न महत्वाचा आहे. सांगलीत सर्व यंत्रणांनी बैठक घेतली. सांगलीकडे जास्त लक्ष असून सांगलीकरांनी घरी बसण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केलं. 

कोणता स्थानिक नेता बाहेर पडला तर त्याच्यामागून कार्यकर्ते आणि जनता देखील बाहेर पडते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी देखील याची काळजी घ्यावी असे ते म्हणाले.

संख्येत वाढ

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे नवे ५ रुग्ण आढळ्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ६० वर पोहचली आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्येही १ नवा कोरोना रुग्ण आढळला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १५९ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

लॉकडाऊन असलं तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय.

तरीही नागरिक बाजारात मोठी गर्दी करताना दिसतात. सरकारकडून घरीच राहण्याचं सतत आवाहन करण्यात येतंय. मात्र नागरिक याकडे तितकंस गंभीरपणे पाहत नसल्याचं चित्र आहे.

नागरिकांनी पुढचे काही दिवस घरीच राहावं. आगामी १५ ते २० दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे असून या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते.

त्यामुळे आता नागरिकांनी कृपा करून घराबाहेर पडूच नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५९ वर गेलाय. तर संपूर्ण देशात ८०० हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.