ट्रेकिंगसाठी गेलेल्‍या कल्याणच्या तरुणाचा दरीत पडून मृत्‍यू

चौघांपैकी एकाचा खोल दरीत पडून मृत्‍यू 

Updated: Dec 30, 2018, 08:20 PM IST
ट्रेकिंगसाठी गेलेल्‍या कल्याणच्या तरुणाचा दरीत पडून मृत्‍यू title=

कल्याण : पनवेलजवळच्‍या इरशाळगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्‍या चौघांपैकी एकाचा खोल दरीत पडून मृत्‍यू झाला आहे. तर त्‍याचे तीन सहकारी सुखरूप आहे. क्षितीज सांगळे असं त्‍याचे नाव असून तो अवघा २० वर्षांचा होता. कल्‍याण येथील अतीश कासारे, सुधाकर इप्‍पर, निलेश कासारे आणि क्षितीज सांगळे हे चौघे ट्रेकिंगसाठी इरशाळगडावर आले होते. त्‍यावेळी सायंकाळच्‍या सुमारास ही दुर्घटना घडली. खालापूर पोलीस, गिर्यारोहक तसेच अपघातग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी आलेल्या पथकाने मोठया शिताफीने क्षितीजचा मृतदेह बाहेर काढला. सध्या पंचनाम्‍याचे काम सुरु आहे.