Corona : आतापर्यंत एका दिवसात कल्याण-डोंबिवलीत एवढ्या प्रमाणात नागरीक बाधित झाले नाहीत

कल्याण-डोंबिवलीत आज सर्वाधिक ७११ जण कोरोनाबाधित झाले आहेत, एका दिवसात एवढे रूग्ण बाधित

Updated: Mar 23, 2021, 10:46 PM IST
Corona : आतापर्यंत एका दिवसात कल्याण-डोंबिवलीत एवढ्या प्रमाणात नागरीक बाधित झाले नाहीत title=

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत आज सर्वाधिक ७११ जण कोरोनाबाधित झाले आहेत, एका दिवसात एवढे रूग्ण बाधित होण्याचा हा पहिलाच दिवस आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 711 हजार इतकी झाली आहे.  तर कल्याण डोंबिवलीत ३ जणांना जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी २३ मार्च २०२१ ची आहे. राज्यात आज एकूण १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण -डोंबिवलीतही लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.

मुंबई शहरात जेवढ्या मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर होतो, तुलनेने कल्याण डोंबिवली शहरात हे प्रमाण दिसून येत नसल्याचं सांगण्यात येत आहे, तसेच रात्रीपर्यंत फेरीवाल्यांनी रस्ते गजबजलेले असतात, यामुळे हे प्रमाण साहजिकच वाढणार असल्याचं स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे.

मुंबईतील कोरोना मिटर

कोरोना हद्दपार होणार, अशी स्थिती असताना ठाण्यात फेब्रुवारीच्या मध्यानंतर आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. २ फेब्रुवारीला मुंबईतील ३३४ वर घसरलेली रुग्णसंख्या आता २ हजारावर गेली आहे. काही दिवसांपासून धारावीतही कोरोनाने डोकेवर काढले आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत सलग रुग्णसंख्या वाढते आहे.