गटारीमुळे खड्डेभरणीचं काम बंदचा आयुक्तांचा अजब दावा

नगरसेवकांनी प्रशासनाला खड्ड्यांवरून धारेवर धरल्यानंतर त्यांनी हे विधान केलं. 

Updated: Aug 10, 2018, 10:05 PM IST
गटारीमुळे खड्डेभरणीचं काम बंदचा आयुक्तांचा अजब दावा

मुंबई : गटारी असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत खड्डेभरणीचं काम बंद असल्याचं धक्कादायक आणि अजब विधान केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी केलंय. केडीएमसीच्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला खड्ड्यांवरून धारेवर धरल्यानंतर त्यांनी हे विधान केलं.

धक्कादायक कारणं  

कल्याण-डोंबिवलीत खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झाले असून आत्तापर्यंत पाच बळी गेलेत. यावरून केडीएमसीच्या मागच्या महासभेत प्रचंड गदारोळ झाला होता. शेवटी ही महासभा तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब महासभा पुन्हा सुरू झाली.

या सभेत पुन्हा एकदा सगळ्याच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत खड्डेभरणी सुरू नसल्याचा आरोप केला. त्यांना उत्तर देताना आयुक्तांनी गटारी असल्यानं काम बंद असल्याचं अजब आणि धक्कादायक कारण दिलं.