नाशिक : खानदेशाच कुलदैवत असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीच्या गडावर रविवारपासून चैत्रोत्स्वाला सुरुवात होतेय. हजारो खानदेशवासीयांनी पायपीट करून दर्शनासाठी गड गाठतात तर गुजरात आणि इतर राज्यातून दरवर्षी सुंमारे पाच लाख भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक होतात या पार्श्वभूमीवर गडावर खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पौर्णिमेसाठी कळवण- नांदुरी रस्त्यावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व बससेवा, खासगी वाहने अभोणामार्गे वळविण्यात आले आहे. गेल्या सात वर्ष होऊनही आणि आता सर्व परवानग्या मिळूनही फर्नायक्युलर ट्रोली सुरु होत नसल्याने भाविक नाराज आहे.
चैत्रोत्स्वाच्या यात्रेत लहान- मोठे हजारो दुकाने लावण्यात आली आहेत. ग्रामीण पोलिसांनीही कुठला अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.