कोल्हापुरकरांना मटण 'तिखट', 450 रुपयांवर 1 रुपयाही देण्यास नकार

विक्रते 540 रुपये किलोनेच मटण विकण्यावर ठाम आहेत. 

Updated: Dec 6, 2019, 09:22 PM IST
कोल्हापुरकरांना मटण 'तिखट', 450 रुपयांवर 1 रुपयाही देण्यास नकार

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरात मटणाचे दर 560 रुपये किलो आहेत हे तर आम्ही 20 रुपये हे दर कमी करून 540 रुपये प्रमाणे विक्री करू असे देखील खाटिक समाजाने निर्णय घेतला आहे. पण 540 रुपयांच्यावर आम्ही एक रुपयाही देणार नाही अशी भुमिका ग्राहकांनी घेतली आहे. त्यामुळे कोल्हापुरात मटन दर  वाढीवरून तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीला मटण विक्रते गैरहजर राहीले.  विक्रते 540 रुपये किलोनेच मटण विकण्यावर ठाम आहेत. 

कोल्हापुरात मटण विक्रेते आणि ग्राहक समिती आमने सामने आले आहेत. 450 रुपयाच्या वर 1 रुपया देणार नसल्याची भूमिका ग्राहक समितीने घेतला आहे.त्यामुळे कोल्हापुरातील मटन दरवाढ आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. 

अहवाल आल्यानंतर मटण विक्रते आणि ग्राहक समिती यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहीले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मटण दराचा तिढा वाढल्याचे दिसून येत आहे. उद्या जिल्हाधिकारी यांनी मटण दरासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल येणार आहे. यावरून आता पुढचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी मटण दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली असताना खाटीक समाजाचा समितीत जाण्याला विरोध असल्याचे  मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष विजय कांबळे सांगतात. तर आम्ही मटणाचे दर 560 वरून 540 करायला तयार असल्याचे खाटीक समाजाचे सदस्य दत्तात्रय इंगवले यांनी केले आहे. 

कोल्हापुरातल्या मटण दरावर तोडगा काढण्यासाठी अखेर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला आहे. कोल्हापूर महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने ७ डिसेंबरपर्यंत आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे. कोल्हापूरात गेल्याकाही दिवसांपासून मटणाचे दर वाढले आहे. त्यामुळे मटण थेट नदी पलीकडून आणण्याचा बोर्ड झळकावला... आणि संघर्षाला सुरूवात झाली.

परंतु कोणतेही हिंसक आंदोलक न करता बावडेकरांनी मटणाचे दर कमी केले आहेत. मटण म्हणजे कोल्हापूरकरांचा आवडता पदार्थ. तोच महाग झाल्यामुळे कोल्हापूरकर हैराण झाले होते. काही कोल्हापूरकरांनी बोर्ड लावून तर काहींनी कमी दरात मटण विक्री सुरू केली. 

सुरूवातीचा मटण विक्रेत्यांकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आहे. पण कोल्हापूकरांनी एकदा ठरवलं तर ते मिळेपर्यंत शातं बसतील ते कोल्हापूरकर कसले ? अखेर विक्रेते आणि ग्रामस्तांनी मिळून तोडगा काढला आणि मटणाचे दर कमी केले. त्यामुळे आता बावडेकरांच्या आंदोलनाला यश मिळाले.

बावड्यानंतर आता शहर आणि जिल्हा मटण विक्रेत्यांकडून दर कमी करण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी मान्य झाली नाही, तर मात्र 'आमचं ठरलंय मटण बावड्यातूनच आणायचंय' असे बोर्ड दिसले, तर आश्चर्य वाटायला नको.