कोल्हापुरात सहा ठिकाणी खासगी सावकारांवर सहकार विभागाच्या धाडी

सहकार विभागाच्या कोल्हापुरात सहा ठिकाणी धाडी पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील खासगी सावकारांवर धाडी टाकल्या आहेत.  

Updated: Jan 28, 2020, 11:10 PM IST
कोल्हापुरात सहा ठिकाणी खासगी सावकारांवर सहकार विभागाच्या धाडी

कोल्हापूर : सहकार विभागाच्या कोल्हापुरात सहा ठिकाणी धाडी पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील खासगी सावकारांवर धाडी टाकल्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील सज्जन पाटील यांच्या जयसिंग मेडिकल, जयसिंग ज्वेलर्स, सुवर्ण बली व्यापारी पतसंस्थेसह त्यांच्या निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

करवीर तालुक्यातील दोन ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई  केली. उशिरापर्यंत कागदपत्रांची छाननी सुरू आहे. अवैधरित्या गोरगरिब लोकांकडून पैसे लुटल्याच्या परिसरात चर्चा आहे. गेल्या महिन्यात सोळा सवकारांवर केलेल्या कारवाईनंतर पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे.