मुंबई : केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत देशभरातील अनेक बंदरं जोडली जाणार आहेत.
कोकणातील कुरधुंडा, करजुवे, माखजन, बरबांड आणि कोंडिवरले या बंदरं जोडली जाणार आहेत. यासाठी या बंदरांचं सर्वे करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १२० कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहेत.
कोकणात अनेक प्राचीन बंदरं आहेत. देखभालीच्या अभावामुळे या बंदरांची दुरावस्था झाली आहे. या बंदरांचा व्यापारी उपयोग थांबलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याच्याही आधी या बंदरांचं खूप महत्व होतं. अलिकडच्या काळात मात्र या बंदरांची हेळसांड झाली आहे. त्यामुळे ती कार्यक्षमही राहिलेली नाहीत. ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
परंतु केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत त्यांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत कोकणातील या बंदरांचा विकास होऊन त्या ठिकाणी बोट टर्मिनस बांधण्यात येणार आहे. जवळपासच्या महामार्गांशी तसंच रेल्वे स्थानकांशी ती जोडली जाणार आहेत. तिथे पर्यटनाही चालना देण्यात येणार आहे.