कोकण रेल्वे वाहतुकीला फटका, कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

Konkan Kanya Express engine failure : कोकण रेल्वे मार्गावर आज सकाळी वाहतुकीला मोठा फटका बसला.  कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबळी होती.  

Updated: May 15, 2022, 11:20 AM IST
कोकण रेल्वे वाहतुकीला फटका, कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड title=

 रत्नागिरी : Konkan Kanya Express engine failure : कोकण रेल्वे मार्गावर आज सकाळी वाहतुकीला मोठा फटका बसला.  कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबळी होती. दरम्यान, खोळंबलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. (Konkan Railway traffic hit, engine failure of Konkan Kanya Express)

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानं कोकण रेल्वेचीवाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र कोकणकन्याला नवं इंजिन जोडून सिंधुदुर्गच्या दिशेने गाडी रवाना करण्यात आली. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तुतारी आणि मंगला एकस्प्रेस यांच्यासह इतर गाड्याही उशाराने धावत आहेत. कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक गाड्या काही स्थानकांवर थांबविण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. त्यामुळे गावी येणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. 

कोकणकन्या गाडीच्या इंजिनात रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे येथे बिघाड झाल्याने सिंधुदुर्गातील वैभववाडी येथून पर्यायी इंजिन मागवण्यात आले होते. त्यामुळे पर्यायी इंजिन बसवून कोकण कन्या मार्गस्थ करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक आता सुरु झाली आहे. आरवली निवसर दरम्यान कोकणकन्या थांबविण्यात आली होती. 

 मे महिन्याची सुट्टी असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. यंदाही कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांमधून हजारो मुंबईकर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच गोव्यात दाखल झाले आहे.  रेल्वे गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे अनेक जण उभ्यांने प्रवास करत आहेत. त्यामुळे विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.