Ladki Bahin Yojna: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात धडाकेबाज निर्णय घेण्यात येत आहेत. आधी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर भावांसाठीदेखील योजना आणा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरु आहे. त्यामुळे लवकरच लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांच्या खात्यात येणे सुरु होणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.
राज्यातील महिलांनी मोठ्या संख्येने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत. हे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. तसेच सरकारकडून यासाठी अॅप्लिकेशन आणण्यात आले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जात आहेत. महिलांकडून आपल्या बॅंक खात्याचा तपशील यात देण्यात येत आहे. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर ही अपडेट महत्वाची आहे. रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला बॅंक अकाऊंट तपासायला हवे. कारण या दिवशी एकावेळी लाडकी बहीण योजनेचे 2 हफ्ते तुमच्या अकाऊंटवर येणार आहेत.
2 ऑगस्टला शिल्लोडमधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचे औचित्य साधून बहिणीच्या बॅंक खात्यांमध्ये पैसे येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारकडून महिलांना रक्षाबंधनचे गिफ्ट देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. संभाजी नगरचा पालकमंत्री झाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पालकमंत्री पदाबाबत भाजप आणि शिवसेनेत कोणतेच वाद नाहीत. आम्ही सर्वजण समाधानी आहोत, असेही ते म्हणाले. सर्वप्रथम आपण इथल्या पाण्याचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवणार
असल्याचे ते म्हणाले. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न लवकरच मुख्यमंत्री सोडवतील, त्यांनी तशी शपथच घेतली होती, असेही सत्तार म्हणाले.
रक्षाबंधनच्या दिवशी दीड कोटी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 3 हजार रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत 2 महिन्याचे पैसे सरकार कडून दिले जाणार आहेत. लाडकी बहिण योजनेचे काम 19 ऑगस्टच्या आधी पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत. 19 ऑगस्ट रोजी दीड कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.एकाच दिवशी महिलांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा करण्याचा सरकारचा निर्धार आहे.
IND
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
ENG
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
England beat India by 5 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
SAM-W
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
(113 ov) 471 (96 ov) 364
|
VS |
PNG-W
465(100.4 ov) 373/5(82 ov)
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.