शासकीय कोविड केअर सेंटर बाहेर कोरोना रुग्ण पडून

मेडिकल कॉलेजच्या बाहेर एक कोरोना रुग्ण बाहेर पडलेल्या अवस्थेत

Updated: Sep 7, 2020, 07:34 AM IST
शासकीय कोविड केअर सेंटर बाहेर कोरोना रुग्ण पडून title=

लातूर : लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या मेडिकल कॉलेजच्या बाहेर एक कोरोना रुग्ण बाहेर पडलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ऑटोतून आणलेल्या या रुग्णाला मेडिकल कॉलेजच्या डेडिकेटेड कोविड सेंटरच्या बाहेर विव्हळत पडलेला दिसत आहे. शेजारी त्या रुग्णासोबत महिला नातेवाईक दिसत आहे. 

त्याठिकाणी मेडिकल कॉलेजची एक ऍम्ब्युलन्सही येऊन जाते. मात्र त्यानंतरही तो रुग्ण तिथेच पडलेला दिसत आहे. काही वेळानंतर पीपीई किट घातलेला एका डॉक्टर किंवा कर्मचारी तिथे येऊन त्या रुग्णाची विचारपूस करतो. त्यावेळी एक व्हील चेअर त्या ठिकाणाहून जाताना दिसत आहे. 

मात्र त्यात त्या रुग्णाला घेऊन जाताना दिसत नाही. त्यानंतर काही काळानंतर रुग्णाला आत मध्ये घेतल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबाबत शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे डॉ. डोपे यांच्याशी संपर्क साधला असता हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे ते सांगू शकले नाहीत. 

रुग्णालयात येण्यापूर्वी फिवर ओपीडीमध्ये जाणे गरजेचे असते आणि याची कसलीही कल्पना रुग्णालय प्रशासनास नसल्याचे डॉ.संतोषकुमार डोपे यांनी सांगितलं आहे. तसेच याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी असमर्थतता दर्शविली आहे.