वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकांवर संक्रांत; शेतकरी चिंतेत

दुष्काळाची परिस्थिती असतानाही पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेल्या टोमॅटो पिकांचे वादळी वारे आणि सततच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. 

Updated: Jun 10, 2024, 06:56 PM IST
वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकांवर संक्रांत; शेतकरी चिंतेत title=

Latur Tomato Crop Affect : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या 48 तासात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यातच आता चार दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकाचे नुकसान झाले आहे. 

पावसामुळे मोठं नुकसान

लातूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाला होती. या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असतानाही पोटच्या लेकराप्रमाणे जगवलेल्या टोमॅटो पिकांचे वादळी वारे आणि सततच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. चार दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांवर टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ

गेल्या चार दिवसांपासून लातूरमधील कासारशिरसी परिसरातील कोराळी वाडी या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे काही शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे टोमॅटो उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत आहेत. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या टोमॅटो पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळे टोमॅटो हे खराब होत असल्याचे दिसत आहेत. सध्या टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत असतानाही पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवार आणि रविवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला. तर पुणे शहरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली होती. पुण्यात अनेक भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.  हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.