'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला

कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती.  

Updated: Jul 19, 2017, 09:34 PM IST
 'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला title=

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, कोणी तोडफोड केली याची माहिती उघड करण्यात आलेली नव्हती. ज्यांने कृत्य केले. तो बाजुला राहिला आणि याचे खापर प्रवाशांवर फोडण्यात येत होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

तेजस एक्स्प्रेसमधील एलसीडीची एका प्रवाशाकडून तोडफोड करण्यात आली. तोडफोड करताना हा प्रवासी चक्क दात काढत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. तोडफोड करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

एलसीडीची तोडफोड कणाऱ्याला रेल्वे न्यायालयाने २२ हजारांचा दंड ठोठावला आहे. तेजस एक्स्प्रेस सुरु झाल्यानंतर यातील हेड फोन ही चोरीला गेले होते. याबाबत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत होता.

दरम्यान, तेजस एक्स्र्पेसमध्ये लावलेल्या महागड्या एलसीडींची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना शोधण्यात रेल्वे मंत्रालयाचा यश आलेय. या आरोपीचं नाव नंदादीप कीर असं असून हा दादरचा रहिवासी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नंदादीपच कृत्य कैद झालं.