राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर

Legislative Council Elections: मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे.. 

Updated: May 24, 2024, 02:35 PM IST
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर  title=
Legislative council elections

Legislative Council Elections: लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील 5 टप्पे संपल्यानंतर आता पदवीधर निवडणुकांसंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालीय. 26 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे.. 

आधी या ठिकाणी 10 जून रोजी मतदान होणार, ही तारीख जाहीर करण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून अपडेट वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे .

पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर, शिक्षक कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. मुंबई पदवीधर सदस्य विलास पोतनीस, कोकण पदवीधर निरंजन डावखरे, नाशिक विभाग किशोरी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपुष्टात येतोय.