close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मानवी वस्तीत बिबट्या; परिसरात दहशतीचे वातावरण

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

Updated: Oct 2, 2019, 03:54 PM IST
मानवी वस्तीत बिबट्या; परिसरात दहशतीचे वातावरण

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात बिबट्या शिरला. बिबट्या शिरल्याच्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पहाटे साडे पाचच्या सुमारास बाळापूरच्या मोमिनपुरा भागात बिबट्या शिरला आणि नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. 

वस्तीत शिरलेल्या बिबट्याने एका घराच्या खिडकीतून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी आरडा ओरड केल्याने बिबट्या खाली उतरला. या नंतर पुन्हा एकदा बिबट्याने एका घराच्या दरवाजातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि तेथे उपस्थित असलेल्या दोन जणांवर हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या एका घरात घुसला. नागरिकांनी त्याला घरात कोंडले. वनविभागाची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.