Rajaram Sakhar Karkhana Result LIVE : राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा निकाल; 21 पैकी 21 जागांवर माहाडीक गट विजयी

Rajaram Sakhar Karkhana Election Results LIVE: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठापनाला लागली आहे. 

Rajaram Sakhar Karkhana Result LIVE : राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा निकाल; 21 पैकी 21 जागांवर माहाडीक गट विजयी

Rajaram Sugar Factory Election Results : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चुरस पाहायला मिळणार आहे. या साखर कारखाना निवडणुकीसाठी 91.12 टक्के इतकं चुरशीने मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत.

25 Apr 2023, 17:53 वाजता

21 पैकी 21 जागा माहाडीक गटाने जिंकल्या

दुसऱ्या फेरीत सुद्धा महाडिक गटाचे पॅनेल आघाडीवर

उत्पादन गट क्रमांक 1 मधील उमेदवार आघाडीवर

जवळपास 400 ते 500 मतांनी महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

महाडिक गट 21 - पाटील गट - 0 अशा आघाडी पहायला मिळत आहे. 

25 Apr 2023, 14:40 वाजता

Rajaram Sugar Factory Election Results : छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असला तरी उर्वरित 20 जगाचा निकाल दुसऱ्या फेरीनंतर लागेल असे सांगण्यात आले. दरम्यान, अद्याप पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु आहे.

25 Apr 2023, 14:23 वाजता

Rajaram Sugar Factory Election Results : छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती.  संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी.  महाडिक यांना 129 पैकी 84 मते तर विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना 44 मते

25 Apr 2023, 13:23 वाजता

सत्तधारी गटाचे 21पैकी 11 उमेदवार आघाडीवर 

Rajaram Sugar Factory Election Results : राजाराम साखर कारखाना निवडणूक. सत्तधारी गटाचे 21पैकी 11 उमेदवार आघाडीवर आहेत. एकूण दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु आहे. गट क्रमांक एक, दोन, तीन आणि चार मध्ये महाडिक पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत

महाडिक गटाचे आघाडीवर असणारे उमेदवार

1) भोसले विजय वसंत 
2) मगदूम संजय बाळगोंडा
3)  शिवाजी रामा पाटील
4) सर्जेराव बाबुराव भंडारे
5) अमल महादेवराव महाडिक
6) विलास यशवंत जाधव
7)  डॉ.मारुती भाऊसो किडगावकर
8)  सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)
9) तानाजी कृष्णात पाटील
10) दिलीप भगवान पाटील 
11)  मीनाक्षी भास्कर पाटील

25 Apr 2023, 13:22 वाजता

मतपेटीमध्ये पत्र टाकून मतदारांनी नाराजी 

 Rajaram Sugar Factory Election Results : राजाराम साखर कारखाना मतपेटीमध्ये पत्र टाकून मतदारांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी आणि विरोधी गटाला देखील सुनावले खडे बोल. माजी चेअरमन सर्जेराव माने यांच्यावर व्यक्त केली प्रचंड नाराजी

25 Apr 2023, 11:52 वाजता

महाडिक पॅनेलचे एकूण 5 उमेदवार आघाडीवर

Rajaram Sugar Factory Election Results : छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी निकाल एकूण दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु आहे. गट क्रमांक एक मधून महाडिक पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत तर गट क्रमांक दोनमध्ये देखील महाडिकट पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत. आत्तापर्यत हाती आलेल्या कलानुसार महाडिक पॅनेलचे एकूण 5 उमेदवार आघाडीवर आहेत.

25 Apr 2023, 11:49 वाजता

Rajaram Sugar Factory Election Results : छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी निकाल अपडेट हाती आले आहे. व्यक्ती उत्पादक सभासद गटामध्ये देखील महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर.

सतेज पाटील गट  
1) किबिले शिवाजी ज्ञानू - 2271
2) पाटील दिलीप गणपतराव - 2317
6) माने अभिजित सर्जेराव - 2168

महाडिक गट 

3) शिवाजी रामा पाटील - 3202
4) सर्जेराव बाबुराव भंडारे - 3184
5) अमल महादेवराव महाडिक - 3303

25 Apr 2023, 11:12 वाजता

Rajaram Sugar Factory Election Results : छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस. पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर. उत्पादक गट क्रमांक 1 मध्ये सत्ताधारी आघाडीवर 

गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदान 

आमदार बंटी पाटील पॅनल

- बेनाडे शालन बाबुराव- 2441 मते

- भोसले किरण बाबासो-2413
 
महाडिक पॅनेल

- भोसले विजय वसंत -3244
- मगदूम संजय बाळगोंडा-3169

25 Apr 2023, 10:07 वाजता

 Rajaram Sugar Factory Election Results : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतपेट्या उघडल्या गेल्या आहेत. एकूण मतदार -13538 त्यापैकी 12336 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

25 Apr 2023, 09:40 वाजता

मतमोजणीच्यादरम्यान यांना या ठिकाणी बंदी  

Rajaram Sugar Factory Election Results : मतमोजणीच्यादरम्यान या ठिकाणी बंदी असणार आहे. मुख्य पोस्ट ऑफिस चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच चार नंबर फाटकाकडे जाण्यास आणि येण्यास प्रवेश बंद असणार आहे. पितळी गणपती चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालय आणि रमण मळ्यातून येऊन ड्रिमवर्ल्डच्या पाठीमागील मार्गाने धोबी कट्टापर्यंत ये-जा करण्यात बंदी घालण्यात आली आहे. रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोदामाकडे, तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोदामाकडे जाण्यास बंदी असणार आहे. तसेच या परिसरात मुख्य रस्ते आणि पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक होईल.