Rajaram Sugar Factory Election Results : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चुरस पाहायला मिळणार आहे. या साखर कारखाना निवडणुकीसाठी 91.12 टक्के इतकं चुरशीने मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत.
25 Apr 2023, 09:35 वाजता
Rajaram Sugar Factory Election Results : कोल्हापूर जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणी सुरु झाली आहे. पहिल्या फेरीत 1 ते 29 मतदान केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे. तर दुसऱ्या फेरीत 30 ते 58 मतदान केंद्रांवरील मतमोजणी होईल. पहिली मतमोजणी हातकणंगले तालुक्यातील गावांपासून त्यानंतर इतर गावांची मतमोजणी होणार आहे. संस्था गटातील मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे. संपूर्ण मतमोजणी झाल्याशिवाय अंतिम निकाल जाहीर होणार नाही.
25 Apr 2023, 09:29 वाजता
Rajaram Sahakari Sugar Factory Election Results : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून कसबा बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात ही मतमोजणी सुरु झाली आहे.
सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पनाला लागली आहे. या साखर कारखाना निवडणुकीसाठी 91.12 टक्के इतकं चुरशीने मतदान झाले असून राजाराम साखर कारखण्याचा सभासदवर्ग कोणाच्या पारड्यात मत टाकतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे. यंदा कंडका पाडायचा आहे, असं म्हणत सतेज पाटील यांनी सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केले होते. तर सहकार टिकला पाहिजे अशी भूमिका घेऊन महाडिक सभासदाना सामोरे गेले होते.
मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कशी होणार याची उत्सुकता आहे. कसबा बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यत 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठीची मतमोजणी पूर्ण होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत.