Maharashtra Loksabha Nivadnuk 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून नुकतीच निवडणुकीसाठीच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्ता आली. यामध्ये सात विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरीही पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंच नाव नाही. याशिवाय हेमंत गोडसे, भावना गवळी, राजेंद्र गावित यांचीही नावं टांगणीलाच आहेत.
एकिकडे शिंदे गटाची उमेद वार यादी जाहीर झालेली असतानाच आता उर्वरित नावांना उमेदवारी मिळते का? सत्तासंघर्षामध्ये आता नेमकी कोणती आणि किती समीकरणं बदलतात आणि आजच्या दिवसात राज्यात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
29 Mar 2024, 09:11 वाजता
Loksabha Election 2024 Live updates : मुखमंत्र्यांनी म्हटलं तरीही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही- अभिजित अडसूळ
खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने महायुतीतू नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. यामध्ये बच्चू कडू आणि अडसूळ पिता पुत्र उघडपणे नाराजी वक्त करत आहे. कडू आणि अडसूळ पिता पुत्रांनी रणांविरोधात उघडपणे विरोध करायला सुरुवात केली आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. मी माझा उमेदवारी अर्ज लवकरात लवकर दाखल करणार आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमच्या सोबत आहे. आणि सर्व वरीष्ठ नेत्यांना विचारात घेऊन आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू त्यामुळे मुखमंत्र्यांनी म्हटलं तरीही आम्ही पितापुत्र नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असेही अडसूळ म्हणाले. दरम्यान आमदार रवी राणा यांनी हात जोडून केली केलेली विनंती फेटाळून लावली असून आम्ही हात जोडून विनंती करतो मात्र आम्ही नवनीत राणा यांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही अशी खोचक टीका अभिजित अडसूळ यांनी केली.
29 Mar 2024, 09:05 वाजता
Loksabha Election 2024 Live updates : विजय शिवतारे यांचा विरोध मावळला
बारामतीतून विजय शिवतारे यांचा अजित पवारांना असणारा विरोध मावळला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यात समोट घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधात रणशिंग फुंकलेल्या विजय शिवतारे यांचा विरोध मावळला आहे. शुक्रवारी सासवड येथे शिवतारे आपली भूमिका मांडणार आहेत.
29 Mar 2024, 08:21 वाजता
Loksabha Election 2024 Live updates : शरद पवार सातारा दौऱ्यावर
शुक्रवारी शरद पवार सातारा दौऱ्यावर जाणार असून, 11 वाजता सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या दोन्ही मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा होणार असून यानंतर 2 वाजता पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी संवाद साधतील.
29 Mar 2024, 07:42 वाजता
Loksabha Election 2024 Live updates : कोण आहेत शिंदे गटाचे 8 उमेदवार?
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंड, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील या सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलीय. तर काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या रामटेकच्या राजू पारवेंनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी, नाशिकचे खासदार हेमंत गोडेस, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, पालघरे खासदार राजेंद्र गावित यांना गॅसवर ठेवण्यात आलंय. तर ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवारही जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुस-या यादीची उत्कंठा अधिकच वाढलीय.
29 Mar 2024, 07:41 वाजता
Loksabha Election 2024 Live updates : गोविंदा शिंदे गटात...
अभिनेता गोविंदाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकरांच्या विरोधात गोविंदा मैदानात उतरण्याची शक्यता.