Loksabha Election 2024 Live : भर पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अडचणीत

Loksabha Election 2024 Live Updates : तिथं महाविकासआघाडीकडून काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केली जात असतानाच इथं महायुतीमध्ये मात्र काही जागांवरून मतभेद पाहायला मिळत आहेत.   

Loksabha Election 2024 Live : भर पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अडचणीत

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटून गेली असली तरीही राज्याच्या काही मतदारसंघांमधील जागावाटपाचा पेच मात्र राज्यातील मोठ्या पक्षांना सोडवता आलेला नाही. त्यातच काही नव्या उमेदवारांना संधी मिळाल्यामुळं प्रस्थापित आणि विद्यमान खासदारपदी असणाऱ्या कैक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी पक्षात बंड करण्याची तयारी दाखवली आहे. 

नेहमीच विधानसभा निवडणुकींसाठी स्वारस्य दाखवणाऱ्या अनेक नेत्यांनी यावेळी दिल्लीदरबारी जाण्यात रसदाखवल्यामुळं उमेदवारीवरून महायुतीपासून महाविकासआडीपर्यंत चुरस पाहायला मिळत आहे. महायुतीतही 9 जागांचा तिढा अजूनही कायम असून,  मुंबईतल्या 3 जागांसह ठाणे, नाशिक, संभाजीनगरात उमेदवार ठरेना, वर्षावर आज महत्त्वाच्या बैठकांची सत्र होताना पाहायाला मिळणार आहेत. 

5 Apr 2024, 07:31 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : हिंगोलीत शिंदे गटात नाराजीनाट्य... 

हिंगोलीतील शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट कापलं गेल्याचं दु:ख असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर भावना गवळीही तिकीट नाकारल्याने नाराज असल्याचं ते म्हणाले. तर ही स्क्रीप्ट संजय राठोड आणि मदन येरावार यांनी लिहिल्याचा आरोपही त्यांनी केला. 

5 Apr 2024, 07:20 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : भिवंडीत मविआत बंडखोरी? 

राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून (Bhiwandi Constituency) वरिष्ठांच्या आदेशानुसार, मैत्रीपूर्ण लढत देणार किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढणार असल्याची भूमिका काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे. 

5 Apr 2024, 07:19 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात भाजप पदाधिका-यांचा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात येणा-या इंदापूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न मानला जातोय.. बारामतीत सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अजित पवारांसोबत 20 वर्षांपासूनचा संघर्ष असल्याची आठवण त्यांनी करुन दिली. त्यानंतर फडणवीसांनी पाटलांची समजूत काढली. त्याचाच पुढचा भाग म्हणून फडणवीस इंदापुरात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील. 

5 Apr 2024, 06:51 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या बैठका 

तिन्ही पक्षांची कसोटी पाहणारा जागावाटपाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या बैठका बोलावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत यामध्ये ठाणे, रत्नागिरी, नाशिक लोकसभेचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठका होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात याकडे आता लक्ष लागलंय.