विराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...'

Virat Kohli : ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विराटच्या बॅटमधून समाधानकारक धावा निघाल्या नाहीत. अशातच आता विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

पुजा पवार | Updated: Dec 19, 2024, 06:43 PM IST
विराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...' title=
(Photo Credit : Social Media)

Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विराटच्या बॅटमधून समाधानकारक धावा निघाल्या नाहीत. अशातच आता विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह लंडनला शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात होतं. आता स्वतः विराटच्या लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

विराट आणि अनुष्का लंडनला शिफ्ट होणार याची चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहे, मात्र याबाबत ठोस आणि अधिक माहिती समोर आली नव्हती. मात्र प्रथमच याबाबत कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने खुलासा केला केला आहे. प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दैनिक जागरणला मुलाखत देताना विराट हा त्याची पत्नी आणि मुलासह लंडनला शिफ्ट होण्याची प्लॅनिंग करत असल्याचे सांगितले आहे. 

काय म्हणाले राजकुमार शर्मा?

कोहलीच्या लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दैनिक जागरणला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विराट कोहली कायमचा भारत सोडून परदेशात राहण्याचा विचार करत आहे का? यावर उत्तर देताना प्रशिक्षक म्हणाले, "हो, विराट आपल्या मुलांसह आणि पत्नी अनुष्का सह लंडनमध्ये शिफ्ट होण्याचं प्लॅनिंग करत आहे. तो लवकरच भारत सोडून तिथे शिफ्ट होणार आहे. कोहली सध्या  क्रिकेट व्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवत आहे.

हेही वाचा : आर अश्विनला संन्यास घेण्यास भाग पाडलं? वडिलांचा धक्कादायक आरोप, म्हणाले 'त्याला सतत अपमानित करुन...'

 

विराट बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर टेस्ट सीरिजमधून निवृत्ती घेईल? 

प्रशिक्षक राजकुमार शर्मा म्हणाले, "नाही, विराट अजूनही खूप तंदुरुस्त आहे आणि निवृत्ती घेण्या इतपत त्याचे वय झालेले नाही. विराट आणखी ५ वर्षे क्रिकेट खेळेल, असा मला विश्वास आहे. विराट 2027 च्या वर्ल्ड कपमध्येही खेळताना दिसणार आहे. विराट आणि माझ्यातील समन्वय खूप चांगला आहे. विराट 10 वर्षांचा नव्हता तेव्हापासून मी त्याला चांगला ओळखतो. मी 26 वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. म्हणूनच मी म्हणू शकतो की विराटमध्ये अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे".

मुलगा अकायला लंडनमध्ये दिला जन्म : 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे फेब्रुवारी 2024 मध्ये दुसऱ्यांदा आई-वडील झाले. अनुष्काच्या गरोदरपणातील शेवटचे काही महिने शिल्लक असताना विराट अनुष्काला घेऊन लंडनमध्ये गेला. तिथेच तिने मुलालाही जन्म दिला ज्याचं नाव 'अकाय' असं ठेवण्यात आलं. त्यानंतर टीम इंडियाच्या शेड्युलमधून सुट्टी मिळाली की विराट आपल्या कुटुंबासोबत लंडनला जातो.