Loksabha Election 2024 Live Updates:शिंदे गट आणि भाजपकडून आचारसंहितेचा भंग; जितेंद्र आव्हाड यांची तक्रार

Loksabha Election 2024 Live Updates: महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्यातील 48 जागांसाठी सर्व प्रमुख पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उद्धव ठाकरे गट, भाजपाबरोबरच शिंदे गटाने आपल्या उमेदवारांच्या काही याद्या जाहीर केल्या असल्या तरी बऱ्याच जागांवरील तिढा काय आहे. दिवसभरातील घडामोडींवर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून टाकलेली नजर...

Loksabha Election 2024 Live Updates:शिंदे गट आणि भाजपकडून आचारसंहितेचा भंग;  जितेंद्र आव्हाड यांची तक्रार

Loksabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics 30th March 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुसरीकडे आज अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील रखडलेल्या जागा वाटपावर बैठकी आणि चर्चांचं सत्र आजही सुरुच असेल असं चित्र दिसत आहे. दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आपण या लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घेत आहोत...

30 Mar 2024, 17:31 वाजता

शिंदे गट आणि भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आलाचा आरोप  जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे ज्यांची नाव जाहीर झाली त्यात त्यांची पदं नमूद करण्यात आली आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाच्या पुढे पंतप्रधान असं नमूद करण्याच आल आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

30 Mar 2024, 15:16 वाजता

साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजेंची भेट

साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी शिवेंद्रराजेंची सदिच्छा भेट घेतली. शिवेंद्रराजेंचा आज वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे त्यांना भेटले.

30 Mar 2024, 13:38 वाजता

शिवतारेंची निवडणुकीतून माघार! अजित पवारांना मोठा दिलासा

बारामती लोकसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पती सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा असताना अजित पवारांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला विरोध करण्याची भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती. अनेक आठवड्यांपासून काहीही झालं तरी अजित पवारांविरोधात लढणारच असं सांगणाऱ्या शिवतारेंनी अचानक माघार घेतली आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

30 Mar 2024, 12:41 वाजता

कोल्हापूरमधून शाहू महाराजांविरुद्ध लढणारे शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत कोट्यधीश! संपत्तीचा एकूण आकडा...

Kolhapur Loksabha Election: महाराष्ट्रातील राजकारणात कोल्हापुरातील राजकीय घडामोडी या कायमच चर्चेचा विषय बनला आहे. राजकारण हे कोल्हापुरातील संस्कृतीचा अविभाज्य भाग समजले जाते. याच राजकारणातून कोल्हापुरात अनेक मातब्बर राजकीय घराणी निर्माण झाल्याचा इतिहास आहे. अशातच राजकीय लढाईमध्ये घराणेशाही की इतर पक्ष यांच्यामध्ये लढाई पाहायला मिळतं. यंदाच्या 2024 च्या कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी लढत होणार आहे. मंडलिक यांची राजकीय कारकिर्द आणि संपत्ती किती आहेत ते पाहूयात... येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

30 Mar 2024, 12:39 वाजता

'आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो ना, तेव्हा...', अंबादास दानवेंचा उल्लेख करत फडणवीसांनी सांगितली भाजपाची रणनीती

उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं आहे. अंबादास दानवे आपल्या संपर्कात नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसंच ज्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात उभे करत आहात त्यांच्यातील कोणीही नाही असं सांगत त्यांनी सर्व अपेक्षित नावं फेटाळून लावली आहेत. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

30 Mar 2024, 12:06 वाजता

माजी मंत्री, काँग्रेस नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसचे माजी मंत्री तसेच नेते शिवराज चाकूरकर यांच्या सुनेनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अर्चना चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. मराठवाडा आणि लातूरमध्ये अर्चना यांच्या माध्यमातून पक्षाला सक्षम नेतृत्व मिळालं आहे, असं फडणवीस अर्चना यांच्या पक्षप्रवेशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले.

30 Mar 2024, 11:46 वाजता

ठाकरेंची साथ सोडणार नाही; दानवेंनी विषयच संपवला

ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठीच आपण काम करणार आहोत, असं विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. आंबादास दानवे उद्धव ठाकरे गट सोडणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. मराठवाड्यामध्ये महायुतीची एखही जागा येणार नाही. आपण खैरेंच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम करणार आहे, असं आंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

30 Mar 2024, 11:44 वाजता

Loksabha Election 2024: गडकरींविरुद्ध नागपूरमधून तब्बल 25 उमेदवार? काही तासांत स्पष्ट होणार चित्र

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 48 पैकी 5 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. याच मतदारसंघांमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून या मतदारसंघांमध्ये बहुचर्चित नागपूर आणि रामटेक मतदारसंघाचा समावेशही होतो. आज दुपारी 3 वाजेपर्यंत या मतदारसंघांमधील उमेदवारांची नाव निश्चित होतील. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

30 Mar 2024, 11:23 वाजता

आनंदराज अंबेडकर अमरावतीमधून लढणार

आनंदराज अंबेडकर अमरावती मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहेत. 2 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आनंदराज अंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत.

30 Mar 2024, 11:06 वाजता

बच्चू कडू यांचे महायुतीमधून बाहेर पडण्याचे संकेत?

अमरावती लोकसभा मतदारसंघात आमची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. भाजपा आणि शिवसेनेला वाटत असेल की आम्ही युती धर्म पाळत नाही आणि आम्ही महायुतीतुन बाहेर जावं तर आमची काही हरकत नाही. ते जे निर्णय घेतील त्याचं आम्ही स्वागत करू असं सूचक विधान आमदार बच्चू कडू यांनी परभणीमध्ये केलं आहे.