Maharashtra Breaking News LIVE Updates: धनंजय महाडिकांविरोधात काँग्रेसच्या महिलांची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE Updates: धनंजय महाडिकांविरोधात काँग्रेसच्या महिलांची तक्रार

10 Nov 2024, 20:37 वाजता

बोरीवलीनंतर राज ठाकरेंची माहिममध्ये सभा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज बोरिवली, वर्सोवा आणि माहीम मध्ये सभा पार पडणार आहेत. मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा पार पडणार आहेत. मात्र आज सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे माहीम इथल्या सभेकडे या सभेमध्ये राज ठाकरे काय भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण माहीम मधून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माहीमची ही लढत चुरशीची आहे. कारण माहीम मध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पार पडणार आहे. 

10 Nov 2024, 19:57 वाजता

धनंजय महाडिकांविरोधात काँग्रेसच्या महिलांची तक्रार 

खासदार धनंजय महाडिक यांना लाडक्या बहिणीं संदर्भात केलेले वक्तव्य भोंवण्याची  शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसच्या महिलांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.यापूर्वी निवडणूक आयोगाकडून देखील महाडिक यांना बजावली होती नोटीस.

10 Nov 2024, 18:13 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : मनसे भाजपची बी टीम : आदित्य ठाकरे

मनसे ही भाजपची बी टीम आहे.  तुम्ही भाजपच्या बी टीमला मतदान करणार का? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे. 

10 Nov 2024, 17:42 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : भाजपचे लोक गुजरातच्या लोकांसाठी काम करतात : आदित्य ठाकरे

मी कधी भाजपवर वैयक्तिक बोललो नाही. पण आम्ही आमच्या स्वत: साठी लढत आहोत. आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत. त्याच ठिकाणी भाजपचे लोक गुजरातच्या लोकांसाठी काम करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

10 Nov 2024, 16:32 वाजता

धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाकडून नोटीस 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचार संहिता 15 ऑक्टोंबर, 2024 पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - 2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.

10 Nov 2024, 15:22 वाजता

विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

विक्रोळी पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडलेल्या आहेत. या विटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत. करोडोंमध्ये यांची किंमत आहे. या चांदीच्या विटा मुलुंड मधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतुन ठेवण्यासाठी नेल्या जात होत्या. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

10 Nov 2024, 14:38 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : 'फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात'

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं भाकित राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात केलंय.. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाची चांगली जाण असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असून मनसे किंगमेकर असणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.. 

 

10 Nov 2024, 14:37 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : घराणेशाहीवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला 

शरद पवारांनी सुप्रिया सुळेंऐवजी अजित पवारांना नेता केलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसता.. तसंच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना संधी दिली असती तर शिवसेना फुटली नसती अशी प्रतिक्रीया अमित शाह यांनी दिलीये.. मुंबईत अमित शाह यांच्या हस्ते भाजपच्या जाहिरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतत्यांनी घराणेशाहीवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. 

 

10 Nov 2024, 14:36 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेल्या चिखलाचं कारण उद्धव ठाकरेच 

महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेल्या चिखलाचं कारण उद्धव ठाकरेच असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय...झी 24 तासच्या टू द पॉइंट या खास मुलाखतीत राज ठाकरेंनी हा आरोप केलाय...

 

10 Nov 2024, 12:41 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणार, काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरु करणार. शिवाय लाडक्या बहिणीला महिन्याला 3 हजार रुपये देणार आहे, अशी घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात करण्यात आलीय.  25 लाखांची विमा कवच देणार आणि मोफत औषधं देणार, अशी घोषणाही मल्लिकार्जून खरगे यांनी केली.