10 Nov 2024, 11:20 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : वृद्धांसाठीच्या पेन्शनमध्ये वाढ, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
प्रत्येक गरीबांना अन्न व निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्ध पेन्शन योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार आहोत. आम्हीच ते 1500 रुपये केले होते. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यासाठी मार्केट इंटरवेन्शन करणार आहोत. महाराष्ट्रात २५ लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत. त्यासोबत 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून लाभ देऊ. सरकार स्थापनेच्या 100 दिवसात व्हिजन डॉक्यूमेंट तयार करू. मेक इन महाराष्ट्राचं धोरण प्रभावीपणे राबवू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
10 Nov 2024, 11:05 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
आजचं संकल्पपत्रात अनेक गोष्टी आहेत. ज्या २५ गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील 10 मुद्दे जो आम्ही महायुतीचा दहाकलमी कार्यक्रम घोषित केला. आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आम्ही भावांतर योजना आणणार आहोत. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्यावर्षी करून दाखवलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
10 Nov 2024, 11:02 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत आहे. दरडोई उत्पन्न वाढत आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न 6 हजार रुपयांनी कमी झाले होते. पायाभूत सुविधांमध्ये डबल इंजिन सरकारमुळे झपाट्याने वाढ झाली. 10 वर्षांत 13 हजार 60 किलोमीटरहून अधिक वाढ झाली आहे. 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे भाजपचे संकल्प पत्र महत्त्वाचे आहे. हे संकल्पपत्र म्हणजे अलमारीत बंद करण्याचे डॉक्युमेंट नाही. तर अंमलबजावणी करण्याचे डॉक्युमेंट आहे. त्यासाठी एक अंमलबजावणी समिती नेमली असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
10 Nov 2024, 11:01 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पत्रकार परिषद घेत जाहीरनामा प्रकाशित करण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार तसेच भाजपचे इतर दिग्गज नेते उपस्थित आहेत.
10 Nov 2024, 10:32 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : प्रचार सभा घेण्यासाठी ठाकरे बंधू आमने-सामने
मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शेवटची प्रचार सभा घेण्यासाठी ठाकरे बंधू आमने-सामने आलेत. 17 नोव्हेंबरला शिवाजीपार्कमध्ये शेवटची प्रचार सभा घेता यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं अर्ज केला होता. मात्र सुरुवातीला या दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली होती. वर्षाला 45 दिवस मैदान वापरण्याची मर्यादा संपल्याने ही परवानगी नाकारण्यात आली होती. आज शिवसेनेला शिवाजी पार्कात सभा घेण्याची परवानगी देण्यात आलीये.मात्र आज शिवसेनेची शिवाजी पार्कात सभा होण्याची चिन्ह कमी असल्याने आजचा एक दिवस बाद होऊ शकतो. आणि त्यामुळेच मनसे आणि शिवसेना UBT पैकी एकाला परवानगी मिळू शकतेय. या दोन्ही पक्षांचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
10 Nov 2024, 10:31 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : रामराजेंवर अजित पवारांचं टीकास्त्र
अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांचा चांगलाच समाचार घेतलाय.. तुम्ही श्रीमंत राजे आहात.. त्यामुळे बंद दाराआड चर्चा कशी करता असा चिमटा अजित पवारांनी साताऱ्यातील सभेतून रामराजेंना काढलाय.. तसेच रामराजे तुम्ही दीपक चव्हाण यांचा उघड उघड प्रचार करा मग बघतो तुम्ही आमदार कसे राहता. असा थेट इशाराच अजित पवारांनी भरसभेतून दिलाय..
10 Nov 2024, 10:23 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : मनसे भाजपची बी टीम-आदित्य ठाकरे
मनसे भाजपची बी टीम, असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी शिवडीच्या सभेत साधला. भाजपच्या बी टीमला मतदान करणार का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी जनतेला विचारला. एकनाथ शिंदेंना मतदान करणार का?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
10 Nov 2024, 09:11 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक
भाजप खासदार धनंजय महाडिकांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेस नेते सतेज पाटलांनाही त्यांच्यावर टीका केलीये. धनंजय महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे त्यामुळेच त्यांनी महिलांचा अपमान केला. भाजपच्या खासदाराच्या या विधानावरून त्यांचा खरा चेहरा समोर आला, असं पाटील म्हणालेत. तर काँग्रेसचे नेते फेक नरेटीव्ह पसरवत आहेत, असा आरोप धनंजय महाडिकांनी केलाय.
लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणा-या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, असं वादग्रस्त विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी केलं होतं.
10 Nov 2024, 09:10 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : खडकवासलात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका
खडकवासलात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे. 13 तारखेला मयुरेश वांजळेंसाठी राज ठाकरेंची सभा असणार आहे. सचिन दोडकेंसाठी शरद पवारांची 14 तारखेला तर 15 तारखेला भीमराव तापकीरांसाठी फडणवीसांची खडकवासलात सभा होणार आहे.
10 Nov 2024, 09:08 वाजता
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात आजही प्रचाराचा धुरळा
राज्यात आजही प्रचाराचा धुरळा उडणारेय. अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्र दौ-यावर आहेत. बुलढाण्यातील मलकापूर, मोर्शीमध्ये त्यांची सभा होणारेय. तर जळगावच्या फैजपूरमध्येही ते प्रचार सभा घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस धामणगावमध्ये प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ सभा घेणारेत. शरद पवार आज राहुल मोटेंसाठी परंडा आणि राजेश टोपेंसाठी घनसावंगीमध्ये सभा घेणारेत. उद्धव ठाकरेंची तोफ आज सांगोल्यात धडाडणारेय. दीपक साळुंखेंसाठी प्रचार सभा होणार आहे. नितीन गडकरीही आज उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरणारेत. उमरखेड, राळेगाव आणि यवतमाळच्या अकोलाबाजार अशा तीन ठिकाणी ते सभा घेतील. वंचितचे प्रकाश आंबेडकर आज लातूर, धाराशिवमध्ये सभा घेणार आहेत.