Maharashtra Breaking News LIVE Updates: महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE Updates: महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

3 Nov 2024, 20:02 वाजता

आचारसंहितेचा भंग? तुकाराम काते यांच्याकडून महिलांना साडीवाटप

चेंबूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम काते यांच्याकडून महिला मतदारांना साडीवाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून केला जात आहे. ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून कारवाईची मागणी देखील करणार आहेत. 

3 Nov 2024, 19:13 वाजता

महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

मंगळवारी कोल्हापुरात महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार

महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महत्त्वाचे नेते सभेला उपस्थित असणार

3 Nov 2024, 17:25 वाजता

मनोज जरांगे यांची उमेदवारांसोबतच पुन्हा बैठक सुरू

मनोज जरांगे आज राज्यातील मतदार संघ आणि त्या मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करणार आहेत. या अनुषंगाने जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उमेदवारांची बैठक  बोलावली होती. परंतु ही बैठक काही वेळ थांबवण्यात आली. आता पुन्हा या बैठकीला सुरुवात झाली आहे.

3 Nov 2024, 16:01 वाजता

कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घाला, नाना पटोले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी 

कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रातून मागणी 

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे 

कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

3 Nov 2024, 15:03 वाजता

श्रीनगरच्या  लाल चौकात हँड ग्रेनेडचा स्फोट, 6 जण जखमी 

जम्मू काश्मीरच्या श्रीनगर परिसरातील लाल चौकात हँड ग्रेनेडचा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून स्फोटाची चौकशी सुरु आहे. 

3 Nov 2024, 14:17 वाजता

फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल 

- उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 

- बंडखोरांना शांत करण्याचा महायुतीचा प्रयत्न

3 Nov 2024, 13:07 वाजता

जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक

जितेंद्र आव्हाडांनी भाजप आणि संघावर केलेल्या टीकेनंतर भाजप नेतेही आक्रमक झालेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रसाद लाड यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलंय. जितेंद्र आव्हाडांनी विष पिलं आहे. त्यामुळे ते विषारी झालेत असा हल्लाबोल बावनकुळेंनी केलाय. तर आव्हाड भाजपचा द्वेष करणारे नेते आहेत. जनता त्यांना धडा शिकवणार, असं उत्तर प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलं आहे. 

3 Nov 2024, 12:44 वाजता

बीड जिल्ह्यातून केज मतदार संघ जरांगे लढणार

 मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण आंदोलकांचे उमेदवार देखील जाहीर केले आहेत. 

3 Nov 2024, 12:32 वाजता

14 नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर मोदींची जाहीर सभा

- विधानसभा निवडणुकीसाठी मोदी महाराष्ट्रात

- पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत जाहीर सभा

- विधानसभेच्या प्रचारासाठी 14 नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर मोदींची जाहीर सभा

- पंतप्रधान मोदी कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष

3 Nov 2024, 11:45 वाजता

मनोज जरांगे मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे जाहीर करणार 

मनोज जरांगेंनी आज अंतरवाली सराटीत इच्छूक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जरांगे उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत.या बैठकीनंतर जरांगे राज्यातले मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. यामुळे आज जरांगे कोणत्या मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, दरम्यान, राज्यातील राखीव मतदार संघातील उमेदवारांबरोबरच मुस्लिम उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा करण्याची शक्यता आहे..