Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे गणित चुकले ??

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे गणित चुकले ??

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, मनसेही 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आज महाविकास आघाडीही उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.

23 Oct 2024, 07:57 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: निलेश राणे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: निलेश राणे दुपारी 4 वाजता कुडाळ येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, दादा भुसे व अन्य नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कुडाळ हायस्कूल पटांगणात भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्ता मेळाव्याला जवळपास १५००० लोक उपस्थित राहतील असा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

23 Oct 2024, 07:55 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: हडपसर रोड नाकाबंदीदरम्यान 22 लाखांची रक्कम सापडली

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पुण्यातील हडपसर रोडवर नाकाबंदी दरम्यान २२ लाख रुपये गाडीत सापडले आहेत.आचारसंहितेच्या कारणास्तव पोलीस चेकिंगच्या वेळेस हडपसर पोलिसांना चेकिंग करताना एका गाडीमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. किराणामालं दुकानदाराची रक्कम असल्याची माहिती मिळत आहे. 

23 Oct 2024, 07:54 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील मोठी अपडेट

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पुण्यातील बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीची डीएनए टेस्ट करण्यात येत आहे. शोएब बाबू शेख याचा डीएनए नमुना काढून फोरेन्सिकला पाठवण्यात आले आहेत. अत्याचार प्रकरणातील फिर्यादी , साक्षीदार , यांची  पोलिसांकडून ओळख परेड होणार आहे. आणखी एका म्हणजे तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरुच आहे. नागपूर आणि मध्यप्रदेश मध्ये पुणे पोलिसांची पथके शोध घेत आहेत

23 Oct 2024, 07:51 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: कोल्हापूर उत्तरचा पेच कधी सुटणार?

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी देऊ केली आहे. राधानगरीमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर तर करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून कोण याचे उत्तर अजून गुलदस्तात आहे. कोल्हापूर उत्तरवर भाजपने दावा सांगितल्यामुळे उत्तरचा पेच अद्याप सुटलेला नाही हे स्पष्ट होतंय.

23 Oct 2024, 07:51 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ समजला जाणाऱ्या साकोली मतदारसंघात काँग्रेसकडून नाना पटोले हे उमेदवार असणार आहेत. तर महायुतीमधील भाजपकडे हा मतदार संघ आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांना टक्कर देण्याकरिता उमेदवार नसल्याने आता भाजपला राष्ट्रवादीमधून आयात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारीमध्ये नाराजीचा सूर पाहायला येत असून भाजपच्या गोटात अंतर्गत कलह वाढणार असून जर राष्ट्रवादीमधून आयात केला गेलं तर संपूर्ण मतदार संघातील भाजपा पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत