Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, मनसेही 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आज महाविकास आघाडीही उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.

23 Oct 2024, 15:40 वाजता

गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे.  त्याला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे.  या शिक्षेला छोटा राजननं दिलेलं आव्हान निकाली लागत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील, असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. मात्र इतर प्रकरणातील अटकेमुळे छोटा राजनचा मुक्काम तुर्तास कारागृहातच राहणार आहे. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 30 मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

23 Oct 2024, 14:11 वाजता

Breaking News LIVE Updates: महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा 3- 4 जागांवर अडली 

3-4 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात फोनवरून चर्चा सुरू. काही तासात हा वाद सुटणार असल्याची सूत्रांची माहिती. 4 वाजता होणारी महा विकास आघाडीची पत्रकार परिषद काही वेळासाठी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता

23 Oct 2024, 13:27 वाजता

Breaking News LIVE Updates: राष्ट्रवादीकडून 6 नव्या चेहऱ्यांना संधी 

हिरामण खोसकर (पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते)
सुलभा खोडके (पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते)
राजकुमार बडोले (पूर्वाश्रमीचे भाजप नेते)
नजीब मुल्ला
निर्मला विटेकर
भरत गावित (माणिकराव गावित यांचे पुत्र, भाजप)

23 Oct 2024, 13:08 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाच्या 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. सर्वप्रथम भाजपने 99 उमेदवार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 45 उमेदवार आणि आता अजित पवार यांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. अजित पवार बारामतीतून लढणार आहे. तर छगन भुजबळ येवल्यामधून निवडणूक लढणार आहेत. 

कोणाला कुठून उमेदवारी संपूर्ण माहिती - Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादी

 

23 Oct 2024, 12:36 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सस्पेन्स कायम. हडपसर विधानसभेतून चेतन तुपे यांना उमेदवारी वडगाव शेरी वरून सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली. 38 जणांच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरे यांचे नाव नसल्याने वडगाव शेरी मतदारसंघ भाजप लढणार असल्याची शक्यता वाढली.

23 Oct 2024, 12:11 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates:  अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना देणार 'हा' उमेदवार?

दादर माहिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंचा शिवसेना पक्ष विभागप्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता. या मतदारसंघात होणार चुरशीची तिरंगी लढत. मनसेतर्फे अमित ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर. तर आता ठाकरे गट महेश सावंत यांना दादर माहिमच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत. आज दादर माहिममधील पदाधिका-यांची मातोश्रीवर होतंय बैठक, या बैठकीत महेश सावंत यांचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. 

23 Oct 2024, 12:02 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates:  वर्ध्यात विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळविण्यासाठी कामाला लागले. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अद्यापही उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले नसले तरी निवडणूक कार्यक्रमानुसार नामांकन अर्ज स्वीकारण्यास व दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 154 अर्जाची उचल करण्यात आली

23 Oct 2024, 11:27 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: संभाजी ब्रिगेडची व शिवसेनेची युती तुटणार? 

संभाजी ब्रिगेड 50 च्या वर उमेदवार जाहीर करणार. शिवसेनेबरोबर असणारी युती संभाजी ब्रिगेड तोडणार 

23 Oct 2024, 10:43 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: शंकरराव गडाख यांच्या अडचणी वाढणार

माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखालील कारखाना असलेला मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाची नोटीस. 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नोटीस आल्याने खळबळ

23 Oct 2024, 10:40 वाजता

संजय राऊतांची पत्रकार परिषद 

आम्ही सौदा करत नाही; आव्हान स्वीकारतो - राऊत
मविआचं जागावाटप लवकर होणार - राऊत 
वरळीतून ट्रम्प, प्रिन्स चार्लसला उभं करणार का? - संजय राऊत 
वरळीच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचा खोचक टोळा