Maharashtra Breaking News Live : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात बऱ्याच घडामोडी घडत असून, त्याव्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टींवर संपूर्ण राज्याचं लक्ष असेल? पाहा सविस्तर....
30 Sep 2024, 19:43 वाजता
इंदापुरात अज्ञाताकडून गोळीबार, एक गंभीर जखमी…
बारामती मधील घटना ताजी असतानाच इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे. तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय. इंदापूर कॉलेज समोरच ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
30 Sep 2024, 18:47 वाजता
5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींचा ठाणे दौरा
ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक सोमवारीठाणे महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. सुमारे 40 हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास अपेक्षित आहे.
30 Sep 2024, 16:27 वाजता
सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या विरोधात युथ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. माधवी पुरी बुच यांच्या विरोधात मोठ्याप्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सेबी कार्यालय बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
सेबी कार्यालया बाहेर पोलिसांनी सर्व युथ काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले.
30 Sep 2024, 15:02 वाजता
तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे
काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादात भेसळ असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने आंध्रप्रदेश राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला म्हंटले की, 'लाडू प्रसाद तपासाचा निकाल न निघता माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती?'. सुप्रीमकोर्टाने मुख्यमंत्र्यांनाही याबाबतचा जाब विचारला. कोर्टाने म्हंटले की, 'SIT ने कुठपर्यंत तपास केला ? मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा आहे. अहवाल जुलै मधे आला मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का केले? तुम्हीच अशी विधान करत असाल तर मग तपासाची काय गरज?' असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. तसेच सुप्रीम कोर्टाने म्हंटले की, 'देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. अहवाल पाहता प्रथमदर्शनी असे दिसते की प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती'.
30 Sep 2024, 13:34 वाजता
Maharashtra Breaking News Live : सरकारचा धडाका; समाजातील घटकांचं मन जिंकण्यासाठी 2 तासात 38 निर्णय
दोन तासांच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णयांचा धडाका.
सर्व घटकांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न.
कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू
(महसूल विभाग)
ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान
(नियोजन विभाग)
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
(नगर विकास विभाग)
ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
(नगर विकास विभाग)
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
(नगर विकास विभाग)
देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.
(पशुसंवर्धन विभाग)
यासह इतरही निर्णय.
30 Sep 2024, 13:33 वाजता
Maharashtra Breaking News Live : बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला जीवे मारलं
बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना समोर आली असून, कोयत्याने वार करून विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला आहे. खून झालेला आणि खून करणारे विद्यार्थी तिघेही अल्पवयीन असून ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असल्याचं सांगितलं जात आहे. खून करणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात दुसऱ्याचा शोध सुरू. कॉलेजमध्येच खून झाल्याने बारामती शहरात खळबळ.
30 Sep 2024, 13:31 वाजता
Maharashtra Breaking News Live : रत्नागिरी - भोस्ते घाटातील गुढ मृतदेह प्रकरणात महत्त्वाची अपडेट
रत्नागिरी - भोस्ते घाटातील गुढ मृतदेह प्रकरणात महत्त्वाची अपडेट. योगेश आर्या हा तरुण शुक्रवारपासून बेपत्ता. पोलिसांकडून शोध सुरू.
मृत व्यक्ती स्वप्नात येत असल्याचा योगेश आर्याचा होता दावा. पोलिसांनी घेतलेल्या शोधानंतर घटनास्थळी आढळून आला होता मृतदेह. मुलाच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात वडिलांच्या फेऱ्या, फरार होण्यापूर्वी योगेश आर्याने लिहिलेली चिट्ठी पोलिसांच्या ताब्यात. पण त्या चिट्टीत नेमके काय? याबाबतीत पोलिसांकडून मात्र काहीही खुलासा नाही.
30 Sep 2024, 13:12 वाजता
धारावीमधील अतिक्रमण प्रकरण : ...तर सरकार कारवाई करेल; लोढांची माहिती
ते स्वतः अतिक्रमण काढत आहेत. सरकारने दिलेला कालावधी संपलेला आहे. अजून काही बाकी असल्यास सरकार कारवाई करेल, असं धारावीमधील अतिक्रमणाबद्दल बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं.
30 Sep 2024, 13:10 वाजता
गोशाळांना देशी गायींपोटी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींपोटी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
30 Sep 2024, 11:31 वाजता
Maharashtra Breaking News Live : रत्नागिरीत जिल्ह्यातील तीन जागांवरील उमेदवारांवर शिक्कामोर्तब?
जिल्ह्यातील तीन जागांवरील उमेदवारांबाबत ठाकरेंकडून जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दापोली, गुहागर, राजापूर जागेवर उमेदवार जवळपास निश्चित. रत्नागिरीमधून उदय सामंतांविरोधात कोण? याबाबत अद्याप निर्णय नाही. दापोलीतून संजय कदम, तर राजापूरमधून राजन साळवींचं नाव निश्चित. गुहागरमधून भास्कर जाधव निश्चित; तर विक्रांत जाधव यांच्या नावाची विचारणा झाल्याची माहिती.