Maharashtra Breaking News Live : इंदापुरात अज्ञाताकडून गोळीबार, एक गंभीर जखमी…

Maharashtra Breaking News Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक यासोबतच इतरही क्षेत्रातील अपडेट्स पाहा...   

Maharashtra Breaking News Live : इंदापुरात अज्ञाताकडून गोळीबार, एक गंभीर जखमी…

Maharashtra Breaking News Live : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात बऱ्याच घडामोडी घडत असून, त्याव्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टींवर संपूर्ण राज्याचं लक्ष असेल? पाहा सविस्तर.... 

30 Sep 2024, 11:12 वाजता

Maharashtra Breaking News Live : नरहरी झिरवाळ सरकार विरोधातच आक्रमक

अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ सरकार विरोधातच आक्रमक. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिके विरोधात नरहरी झिरवाळ आजपासून मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत. धनगर आरक्षण तसंच पेसाभरतीच्या प्रश्नांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मंत्रालयासमोर धरणे आंदोलनाला बसणार आहेत.  त्यांच्या या आंदोलनात राज्यातील विविध आदिवासी संघटनाही सहभागी होणार आहेत.

30 Sep 2024, 10:36 वाजता

Maharashtra Breaking News Live : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित पाठोपाठ मनसेही उमेदवार देण्याच्या तयारीत आहे... मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमरावती येथे विदर्भातील विविध मतदार संघाचा आढावा घेतला...यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं निश्चित झाल्याचे समजतेय. तुषार गिरे यांना दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात लढणार असल्याची चर्चा आहे. 

30 Sep 2024, 10:08 वाजता

Maharashtra Breaking News Live : सरकार आमच्यावर कुठे तरी दुजाभाव करत आहे- नरहरी झिरवाळ 

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नरहरी शिरवाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात आणल्या. 'धनगर आणि धनगट या शब्दांचा अप्राय असून त्या बाबत शासनाने निर्णय घेऊ नये अशी आमची मागणी आहे. तेव्हा शिंदे समिती केली आता 4 ते 5 आयएएस कमिटी केली. सरकार आमच्यावर कुठे तरी दुजाभाव करत आहे. आमची मागणी आहे टाटा इन्स्टीट्यूटने अहवाल दिलाय तो अहवाल प्रसिद्ध करा तो केला जात नाही. हा रिपोर्ट बाहेर न येणं ह संशयास्पद आहे. यावरून आम्ही आता निर्णय घेतला असून, आमदार खासदार माजी लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी होत आहेत', असं झिरवाळ ठामपणे म्हणाले. 

30 Sep 2024, 09:35 वाजता

Maharashtra Breaking News Live : प्रणिती शिंदे यांच्याकडून भाजपवर गंभीर आरोप 

हिंदू-मुस्लिमचा वाद भाजपने आपल्या देशात पेटवला असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. जात-पात-धर्मावर भाजपने राजकारण केलं ज्याला अनेकजण बळी पडले असंही त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत आपल्या देशाला कीड लागली, बुरशी लागली. अशी टीका प्रणिती शिंदेंनी सरकारवर केली.

30 Sep 2024, 09:24 वाजता

Maharashtra Breaking News Live : अलिबाग मुरुडच्या जागेवर काँग्रेसचा दावा

रायगड जिल्ह्यात एकीकडे महायुतीत कर्जतच्या जागेवरून वाद सुरू असताना दुसरीकडे महविकास आघाडीत देखील आलबेल आहे, असे चित्र नाही. काँग्रेसने अलिबाग मुरुडच्या जागेवर दावेदारी करायला सुरुवात केलीय. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अलिबाग मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षाकडे केलीय. या मतदार संघात शेकाप प्रबळ दावेदार मानला जातो. त्यामुळे अलीबागच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस होण्याची शक्यता आहे.

30 Sep 2024, 09:06 वाजता

Maharashtra Breaking News Live : बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धारसाठी आता नव्याने निविदा

ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी पालिका प्रशासनाने आता तीन वेगवेगळ्या निविदा मागवण्याचे ठरवले आहे. आधीच्या कंत्राटदाराने पायऱ्यांचे नुकसान केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पालिकेने गाळ काढण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत तर ऐतिहासिक रामकुंड पुनरुज्जिवित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतगर्त येणाऱ्या हार्बर इंजिनिअरींग विभागाला काम देण्यात येणार आहे.

30 Sep 2024, 08:34 वाजता

Maharashtra Breaking News Live : अक्षय शिंदेला दफन करण्यात आलेल्या स्मशानभूमीत बसवले सीसीटीव्ही कॅमेरे 

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अखेर 6 दिवसानंतर काल उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. मात्र या दफन विधीस शिवसेनेचा शिंदे गटाने विरोध केला होता, त्यामुळे  कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अक्षय शिंदेला दफन करण्यात आलेल्या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, पोलिसांकडूनही स्मशानभूमीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

 

30 Sep 2024, 08:32 वाजता

Maharashtra Breaking News Live : गोधणी चौफुलीवर ट्रक टँकरचा भीषण अपघात 

यवतमाळ शहरालगत नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गोधनी चौफुली अपघात प्रवणस्थळ बनले आहे. याठिकाणी कोळसा वाहतूक करणारा ट्रक व सोयाबीनच्या कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा विचित्र अपघात झाला. यात दोन्ही वाहनातील चालक जखमी झाले. कोळस्याचा ट्रक चौफुलीवर यूटर्न घेत असतानाच नागपूरला जाणारा तेलाचा भरधाव टँकर आला. थेट धडक होऊन नये म्हणून चालकांनी केलेल्या प्रयत्नात ट्रक व टँकर जागेवरच उलटले. त्यामुळे मार्गावर कोळसा आणि तेल पसरले. याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

30 Sep 2024, 07:56 वाजता

Maharashtra Breaking News Live : आदिवासी आरक्षणामधून धनगरांना आरक्षण ?

आदिवासी आरक्षणामधून धनगरांना आरक्षण देणे तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मेगाभरती प्रश्नाविरोधात राज्याचे ‌विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह राज्यातील सर्व आदिवासी आमदार आजपासून मंत्रालयासमोरील गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करणार आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. आंदोलनात राज्यातील विविध आदिवासी संघटना, प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

 

30 Sep 2024, 07:51 वाजता

Maharashtra Breaking News Live : निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य 

शरद पवारांनी निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. 8 ते 10 ऑक्टोबरदरम्यान तारखा जाहीर होतील आणि 15 ते 20  नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केलाय.