Maharashtra Breaking News LIVE: राहुल कर्डीले नाशिकचे नवे महानगरपालिका आयुक्त

Maharashtra Breaking News LIVE: राजकीय घडामोडींना वेग, राज्यातील ठळक घडामोडी जाणून घेऊयात.

Maharashtra Breaking News LIVE:  राहुल कर्डीले नाशिकचे नवे महानगरपालिका आयुक्त

Maharashtra Breaking News LIVE:  हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले आहे. त्यानंतर राज्यात इतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ठळक घडामोडी आणि अपडेट्स एका क्लिकवर

24 Dec 2024, 20:12 वाजता

राहुल कर्डीले नाशिकचे नवे महानगरपालिका आयुक्त

नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांची बदली करण्यात आली आहे. राहुल कर्डीले आता नाशिकचे नवे महानगरपालिका पालिका आयुक्त असणार आहेत. याआधी राहुल कर्डीले यांच्याकडे वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार होता. तर अशोक करंजकर नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. 

24 Dec 2024, 19:30 वाजता

महाराष्ट्र सायबर सेलची मोठी कारवाई

 महाराष्ट्र सायबर सेलची मोठी कारवाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बदनामीकारक व्हिडिओ शेअर करणं भोवलं. 12 समाजमाध्यमांवरील लोकांवर कारवाई. नागपूर काँग्रेस सेवादलाच्या अकाऊंटवर देखील कारवाई.

24 Dec 2024, 19:03 वाजता

तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी देण्यात आलीये. अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आलीये. यामध्ये तुमचाही संतोष देशमुख केला जाणार असल्याची धमकी देण्यात आलीये. मात्र, या प्रकरणाकडे पोलीस गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी केलाय. त्यामुळे धाराशिव पोलिसांची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिलीये. तर या घटनेच्या निषेधार्थ उद्या भूम बंदची हाक देण्यात आलीये.

24 Dec 2024, 18:41 वाजता

नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला तडे 

नागपुरातील बुटीबोरी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला तडे गेलेत. त्यामुळे दक्षता म्हणून उड्डाणपुलावरची वाहतूक बंद करण्यात आलीये. पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुलाची पाहणी केलीय. काही वर्षापूर्वी एका खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून NHAIने पूल बांधल्याची माहिती आहे.

24 Dec 2024, 17:39 वाजता

मुंबईतील जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी 

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोंडी. ट्रकचा टायर फुटल्याने ट्रॅफिक जाम. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. 

24 Dec 2024, 17:10 वाजता

दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस रुळावरून घसरली 

दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस रुळावरून घसरली. गुजरातमधील सुरत जवळ रुळावरून या एक्सप्रेसचा एक डबा घसरला.  या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी नाही.  

24 Dec 2024, 17:04 वाजता

मुख्यमंत्री परभणीला जायला घाबरतात : संजय राऊत

महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, आणि बीड घटनेचे संशयित आरोपी मंत्रिमंडळात आहेत, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. परभणीची घटना राज्याला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागलाय, असा आरोप राऊतांनी केलाय. गृहमंत्री म्हणून फडणवीस परभणीला जायला पाहिजे होते. मात्र ते परभणीला जायला घाबरतात. ते  परभणीला गेले तर सोबत सैनिक घेऊन जातील, अशी टीका राऊतांनी केलीय.

24 Dec 2024, 16:46 वाजता

लाडकी बहीण योजनेतील पैशांचं वितरण सुरू

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.  लाडकी बहीण योजनेतील पैशांचं वितरण सुरू झाले आहे.  महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल. राज्यातील 67 लाखांहून जास्त महिलांना लाभ.

24 Dec 2024, 16:29 वाजता

महाराष्ट्रात मतदार वाढ नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेसला उत्तर 

काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि वाढलेले मतदार यावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर आयोगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. कुठल्याही मतदारांची संख्या वाढलेली नाही असं म्हणत काँग्रेसच्या सगळ्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. 

24 Dec 2024, 16:12 वाजता

बीडचे पालकमंत्रीपद फडणवीस किंवा अजित पवारांनी स्विकारावं : सुरेश धस

बीडचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्विकारावं. अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस आक्रमक झालेत. त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.