Baramati Wrestling Rooster: कोंबडा म्हटला तर किलो दोन किलो वजनाचा पक्षी आपल्या डोळ्यासमोर येतो. पण बारामतीच्या राजा कोंबड्याची मात्र भलतीच हवा आहे. राजा कोंबडा साधासुधा नाही. राजा कोंबडा पैलवान आहे. राजा कोंबड्याचं वजन तब्बल सहा किलो असून राजा कोंबड्याला रोजच्या खुराकात दूध लागतं. कोंबड्याची वेगळीच तऱ्हा पाहायला मिळतेय.
दूध पिणारा राजा कोंबडा सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलाय. बारामतीचा हा राजा कोंबड्याची पैलवान कोंबडा अशी ओळख आहे. पैलवान जसा शरिरयष्टी कमावण्यासाठी दूध पितो. तसं राजा कोंबडाही दूध पितो. राजा कोंबड्याचं वजन तब्बल सहा किलो आहे. राजा कोंबड्याचं हे वजन त्याच्या जातीतल्या पक्षांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. पैलवान कोंबडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाचा खुराकही एखाद्या पैलवानाप्रमाणे आहे. रोज सकाळी मका भरडा, कोंबडी खाद्य, भुसा दिला जातो.दुपारी भुसा, तांदूळ, गहू, बाजरी हे धान्य दिले जातं कोंबड्याला संध्याकाळच्या खुराकात दूध, भुसा, कोंबडी खाद्य दिले जातं.
राजा कोंबडा हा वनराज क्रॉस जातीचा असल्याचं सांगण्यात येतंय. राजा कोंबडा अवघा बारा महिन्यांचा आहे. राजा कोंबड्याचा रुबाब पाहावा असाच आहे. राजा कोंबडा खुराकासोबत दूध पितो. राजा कोंबड्याला दूध प्यायला आवडत असल्याचं त्याचे मालक सांगतात.
सोलापुरातल्या कृषी प्रदर्शनात राजा कोंबडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. राजाचा रुबाब पाहून प्रदर्शनाला येणारे आश्चर्यानं तोंडात बोटं घालताना दिसतायेत. कोंबड्याच्या जगात सध्या राजा कोंबडा तरी महाबली खली आहे.