Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
26 Dec 2024, 09:25 वाजता
मातोश्रीवर आजपासून 29 डिसेंबरपर्यंत बैठकांचं सत्र
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे पक्षानं तयारी सुरू केलीये. आजपासून मातोश्रीवर बैठकां होणार आहेत.. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आजपासून 29 डिसेंबरपर्यंत या बैठका होणार आहेत.. या बैठकांमध्ये मुंबईतील पदाधिका-यांशी चर्चा केली जाणार आहे.. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका होणार आहेत.. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची चाचपणी सुरु असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे या बैठकांकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
26 Dec 2024, 09:25 वाजता
मातोश्रीवर आजपासून 29 डिसेंबरपर्यंत बैठकांचं सत्र
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे पक्षानं तयारी सुरू केलीये. आजपासून मातोश्रीवर बैठकां होणार आहेत.. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आजपासून 29 डिसेंबरपर्यंत या बैठका होणार आहेत.. या बैठकांमध्ये मुंबईतील पदाधिका-यांशी चर्चा केली जाणार आहे.. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका होणार आहेत.. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची चाचपणी सुरु असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे या बैठकांकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
26 Dec 2024, 09:24 वाजता
राज्यात पावसाचा, गारपिटीचा इशारा
राज्यात आजपासून शनिवारपर्यंत मध्य महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवलीय. ..आज आणि उद्या पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस पडू शकतो.. तसंच मुंबईत 28 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.
बातमी सविस्तर वाचा - Maharashtra Weather News : थंडी बॅकफूटवर? राज्याच्या 'या' भागात गारपिटीच्या यलो अलर्टनं वाढवली चिंता
26 Dec 2024, 09:23 वाजता
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामास सुरुवात
मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाउंडेशनची खोदाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, खोदाईच्या कामात कठीण खडक सापडल्यामुळे कामाचा वेग मंदावत असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने याठिकाणी 60 फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचामुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे.
26 Dec 2024, 09:20 वाजता
एकनाथ शिंदेंच्या आज दिल्लीत गाठीभेटी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत भेटीगाठी करणार आहेत. त्यांची ही सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह आणखी काही वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत. भेटीनंतर सहकुटुंब काश्मिरला सुट्टीवर जाणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय
26 Dec 2024, 09:17 वाजता
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज पदभार स्वीकारणार
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज पदभार स्वीकारणार आहेत. याआधी ते सकाळी 11 वाजता बाळासाहेबांचे स्मृती स्थळ आणि चैत्यभूमीला भेट देतील. त्यानंतर न्यू एनएक्स बिल्डिंगच्या 7 मजल्यावर आपला चार्ज घेणार आहेत.
26 Dec 2024, 09:15 वाजता
कल्याण हत्याप्रकरणातील आरोपीला शेगावमधून अटक
कल्याणमधील अल्पवयीन मुलीची हत्या आणि अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून अटक केली. विशाल गवळी सलूनमध्ये असतानाच पोलिसांनी कारवाई केली. त्याला अटक करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. नराधम विशाल गवळीला आज कोर्टात हजर करणार आहे..
26 Dec 2024, 09:14 वाजता
नवी मुंबईत कामगारांच्या ट्रांजिस्ट कॅम्पला आग
नवी मुंबईमध्ये कामगारांच्या ट्रांजिस्ट कॅम्पला आग लागली. वाशी एपीएमसी जवळ सिडकोच्या गृहप्रकल्पासाठी काम करणा-या कामगारांच्या ट्रांजिस्ट कॅम्पला रात्री साडेनऊच्या सुमारासही आग लागली होती. या ट्रांजिस्ट कॅम्प मध्ये एक हजार कामगार वास्तव्यास होते. आग लागल्या नंतर तात्काळ सर्व कामगार बाहेर पडल्याने कोणती जीवित हानी झाली नाही. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सिलेंडरचे स्फोट होत असल्याने आग विझवण्यास अडथळा निर्माण येत होता. अथक प्रयत्नानंतर एक तासांनी आग आटोक्यात आली. मात्र या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.