18 Jan 2024, 20:18 वाजता
जरांगे आणि शिष्टमंडळ बैठकीत नव्या मसुद्यावर तोडगा नाहीच
Government Delegation Visits Jarange : जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्या आजच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. सरकारच्या शिष्टमंडळानं आज सलग दुसऱ्या दिवशी जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेतली. या भेटीत सरकारनं सगे सोयरे मसुद्यावर चर्चा झाली. या नव्या मसुद्यावर जरांगे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत निर्णय घेणार आहेत. दरम्यान कुणबी नोंदी मिळूनही नोंदी न दिल्यानं जरांगे आक्रमक झालेत. नोंदी न मिळाल्याची तक्रार करताच बच्चू कडूंनीही विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. कलेक्टर झोपा काढतायत का? अशा शब्दांत कडूंनी कानउघडणी केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
18 Jan 2024, 18:47 वाजता
बीएमसी खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणला ईडी कोठडी
Suraj Chavan in ED Custody : सूरज चव्हाणला चार दिवसांची ईडी कोठडी.. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाणला 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी.. बीएमसी खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाणला अटक.. ईडी अधिकाऱ्यांनी सूरज चव्हाणची वैद्यकीय चौकशी केली.. सूरज चव्हाणची ईडी कोठडीत रवानगी.
18 Jan 2024, 17:26 वाजता
अहमदनगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटेंकडून तोडफोड
Vandalism in Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्याकडून पाणीपुरवठा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील काही गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रकाश पोटे यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
18 Jan 2024, 17:05 वाजता
पुण्यात चिकन, मटण दुकानं बंद ठेवण्याचा कुरेशी समाजाचा निर्णय
Pune no Non-Veg : 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यातली चिकन, मटणाची दुकानं बंद राहणार आहेत. पुणे शहर कुरेशी समाजानं हा निर्णय घेतलाय. 22 जानेवारीला मटण, चिकन दुकानं बंद ठेवून, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करण्यात येणार आहे. ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीच्यावतीने 22 जानेवारीला कुरेशी समाज आपले सर्व व्यवहार बंद करून या कार्यक्रमात आनंद उत्साहाने सहभागी होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
18 Jan 2024, 16:18 वाजता
22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी
Big News for Central Employees : कर्मचार्यांच्या उदंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे, अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना निमित्त केंद्र सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमध्ये दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
18 Jan 2024, 14:29 वाजता
'मोदींचं वय 80च्या पुढे गेल्यावर विचारू', अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : आरक्षण कायदेशीर कसं देता येईल याचा विचार होईल...प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांना बळी पडू नका...आम्ही सगळ्यांना सामावून घेणारी माणसं...गाडीतील व्हिडिओ व्हायरल करणारा मुर्ख...व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची कीव येते...नाना किती पार्ट्या फिरून आलेत...मोदींचं वय 80च्या पुढे गेल्यावर विचारू...उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाना पटोलेंना टोला
बातमीचा व्हिडीओ पाहा-
18 Jan 2024, 13:44 वाजता
'अजित पवारांनी मोदींचं वय विचारावं',नाना पटोलेंचं अजित पवारांना आव्हान
Nana Patole on Ajit Pawar : अजित पवार आपल्या काकांचं काय वय विचारता त्यांनी मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे...असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना आव्हान केलंय....अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या वयावरून जाहीर भाषणातून टीका करत आहेत...त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळतंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
18 Jan 2024, 13:02 वाजता
मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार...महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केलं जाणार.. या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 20 जानेवारीला जिल्हाधिकार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार
बातमीचा व्हिडीओ पाहा-
18 Jan 2024, 12:37 वाजता
अंबादास दानवेंना भाजपची ऑफर?
Ambadas Danve : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याचा दावा केलाय. मात्र आपण शिवसैनिक असून गद्दारीचा टिळा कपाळावर लावणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
18 Jan 2024, 12:16 वाजता
'साळवी, चव्हाणांवर राजकीय सूडानं कारवाई',संजय राऊतांचा आरोप
Sanjay Raut : राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांच्यावर राजकीय सूडाने कारवाया होत असून, शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी दबाव असल्याचा आरोप राऊतांनी केलाय...दोन दिवसांपूर्वी मुंबईत जनता न्यायालय घेतल्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर लगेच कारवाई करण्यात आली...ही राजकीय अटक असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-